मुंबई - सोशल मीडियावर एखादी व्यक्ती रातोरात व्हायरल होण्यास काहीच वेळ लागत नाही. मागच्या वर्षी याच सोशल मीडियाच्या माध्यमातून रेल्वे स्टेशनवर गाणी गाऊन आपला उदरनिर्वाह करणाऱ्या रानू मंडल प्रचंड व्हायरल झाल्या होत्या. त्यांना चक्क हिमेश रेशमियाने देखील आपल्या चित्रपटात गाणं गाण्याची संधी दिली होती. त्यानंतर त्यांचे नशिब पालटले. आता त्यांच्यानंतर आणखी एक नाव सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिहार येथील सनी बाबा हे चक्क इंग्रजी गाणी गाऊन भीख मागून आपला उदरनिर्वाह करत आहेत.
होय, रानू मंडल यांच्याप्रमाणेच बिहार येथील सनी बाबा हे आपल्या गाण्यांमुळे चर्चेत आले आहेत. विशेष म्हणजे ते इंग्रजी भाषेत गाणे गात असल्याने त्यांच्याविषयी सोशल मीडियावर उत्सुकता पाहायला मिळत आहे.
-
This man, a beggar from Patna sings Jim Reeves "He'll have to go".
— Vandana (@VandanaJayrajan) April 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Priceless ❤️ pic.twitter.com/lJdoRjrxMa
">This man, a beggar from Patna sings Jim Reeves "He'll have to go".
— Vandana (@VandanaJayrajan) April 20, 2020
Priceless ❤️ pic.twitter.com/lJdoRjrxMaThis man, a beggar from Patna sings Jim Reeves "He'll have to go".
— Vandana (@VandanaJayrajan) April 20, 2020
Priceless ❤️ pic.twitter.com/lJdoRjrxMa
ट्विटरवर एका युजरने सनी बाबाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत ते सुरुवातीला हिंदीमध्ये संवाद साधताना दिसतात. त्यानंतर त्यांना इंग्रजीत प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरं देखील पटापट देताना दिसतात. दरम्यान सध्या ते काय करतात, असा प्रश्न त्यांना विचारला असता, त्यांनी सांगितले, की मी भीख मागून आपले जीवन व्यतीत करत आहे. जेही देव मला देतो त्यात मी समाधानी आहे, असे ते इंग्रजीत सांगतात. त्यानी आपल्याला गाण्याची आणि नृत्याची आवड असल्याचे सांगितले. त्यांनी ६० च्या दशकातील सुप्रसिद्ध गायक जिम रीव्हचे एक इंग्रजी गाणे यावेळी गाऊन दाखवले.
सनी बाबाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांना त्यांचा इंग्रजी बोलण्याचा अंदाज अतिशय भावत आहे.