ETV Bharat / sitara

'मिशन मजनू'नंतर 'बीग बी'सोबत काम करणाऱ्या रश्मिकाने साईन केला आणखी एक बॉलिवूड चित्रपट

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना बॉलिवूड पदार्पणासाठी ती आता सज्ज झाली आहे. तिचा पदार्पणाचा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच तिने बॉलिवूडचा आणखी एक चित्रपट साईन केला आहे.

, Rashmika
अभिनेत्री रश्मिका मंदान्ना
author img

By

Published : Apr 27, 2021, 10:55 PM IST

हैदराबाद - दाक्षिणात्य चित्रपटातून नाव लौकिक मिळवलेली अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आता बॉलिवूडच्या दरवाजावर उभी आहे. बॉलिवूड पदार्पणासाठी ती आता सज्ज झाली आहे.

सोमवारी रश्मिकाने तिच्या फॉलोअर्ससमवेत इन्स्टाग्राम लाइव्ह सेशन केले. यावेळी तिने चाहत्यांना सांगितले की तिने बॉलिवूड चित्रपट साईन करणार आहे. तिचा पदार्पणाचा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच तिने बॉलिवूडचा आणखी एक चित्रपट साईन केला आहे.

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना स्पाय थ्रिलर 'मिशन मजनू' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे आणि तिचा दुसरा हिंदी चित्रपट अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'अलविदा' हा आहे.

इंटरएक्टिव सत्रादरम्यान एका चाहत्याने तिच्या इतर बॉलिवूड प्रकल्पांबद्दल विचारले असता हा खुलासा केला. ती म्हणाली, "मी दोन बॉलिवूड चित्रपट करत आहे आणि लवकरच मी तिसरा चित्रपट साईन करणार आहे," असे तिने उत्तर दिले.

तेलगू आणि कन्नड चित्रपटांत आपली ओळख निर्माण करणारी रश्मिका अल्लू अर्जुनची भूमिका असलेल्या 'पुष्पा' चित्रपटामध्येही दिसणार आहे.

हेही वाचा - कंडोम परिक्षकाची भूमिका साकारणार रकुल प्रीत सिंह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.