मुंबई - अभिनेता कार्तिक आर्यननंतर आता सुपरस्टार आमिर खानची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्याने आता स्वतःला क्वारंटाईन केले आहे.
आपल्या आगामी 'लालसिंग चड्ढा' या चित्रपटामध्ये व्यग्र असलेल्या आमिरने कोविड१९ची चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर स्वतःला होम क्वारंटाईन केले आहे. त्याने आपल्या स्टाफलाही चाचणी करण्याचे सांगितले असून आवश्यक काळजी घेण्याचेही आवाहन त्याने केले आहे. उपचार घेतल्यानंतर आमिर पुन्हा एकदा लालसिंग चढ्ढाच्या शुटिंगला सुरुवात करणार आहे.
१६ मार्च रोजी अभिनेता आमिर खान त्याचा जवळचा मित्र अमीन हाझी दिग्दर्शित 'कोई भी जाने ना'च्या स्क्रिनिंगला उपस्थित होता. कोरोनाव्हायरसची चाचणी घेण्यापूर्वी शेवटची उपस्थिती त्याने याच स्क्रिनिंगला लावली होती.
बॉलिवूडच्या अनेक आघाडीच्या कलाकारांना यापूर्वीही या प्राणघातक कोरोना विषाणूची बाधा झाली होती. यामध्ये रणबीर कपूर, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, कृती सेनॉन, तारा सुतारिया, सिद्धांत चतुर्वेदी या कालाकारांचा समावेश आहे.
हेही वाचा - कोण होणार करोडपती' ला मिस्ड कॉल म्हणजे एक करोडचा कॉल!