ETV Bharat / sitara

दीपिकाने इन्स्टाग्राम, ट्विटरवरुन सर्व पोस्ट केल्या डिलीट, चाहत्यांमध्ये खळबळ - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण

अभिनेत्री दीपिका पादुकोणने नवीन वर्षात तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सर्व पोस्ट हटवून चाहत्यांना चकित केले आहे. दीपिकाने अचानक असे करण्यामागे कारण काय हे अद्याप समजू शकलेले नाही.

Deepika
अभिनेत्री दीपिका पादुकोण
author img

By

Published : Jan 1, 2021, 4:34 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने नवीन वर्षात तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सर्व पोस्ट हटवून चाहत्यांना चकित केले आहे. दीपिकाने ३१ डिसेंबर रोजी इन्स्टाग्रामवर आपले सर्व ट्वीट आणि फोटो डिलीट केले असून आता तिच्या खात्यावर कोणतीही पोस्ट किंवा ट्विट नाहीत.

आधी लोकांना वाटलं की कोणीतरी दीपिकाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हॅक केले आहे. तथापि, नंतर सर्वांनी पाहिले की दीपिकाने स्वतः तिचा डीपी (डिस्प्ले इमेज) बदलला होता.

दीपिकाने अचानक असे करण्यामागे कारण काय हे अद्याप समजू शकलेले नाही. सध्या ट्विटरवर दीपिकाचे २.७७कोटी फॉलोअर्स आहेत, तर इंस्टाग्रामवर ५.२५कोटी लोक तिला फॉलो करतात.

दीपिका सध्या राजस्थानमध्ये पती रणवीर सिंगसह सुट्टीवर आहे. अभिनयाबद्दल बोलायचे तर दीपिका आगामी काळात '83' चित्रपटात दिसणार आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात तत्कालीन भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कपिल देव यांची पत्नी रोमी देवच्या भूमिकेत दीपिका दिसणार आहे. कपिलच्या भूमिकेत रणवीर दिसणार आहे.

हेही वाचा - स्वागत २०२१ : बॉलिवूडचे हे चित्रपट करणार बॉक्स ऑफिसवर धमाका

याशिवाय शकुन बत्राच्या आगामी चित्रपटाचा ती एक भाग आहे. ज्यात सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या शीर्षकाविषयी अद्याप चर्चा होणे बाकी आहे.

हेही वाचा - नवीन वर्षात बाबीलने केले वडिल इरफान खान यांचे स्मरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.