मुंबई - हृतिक रोशनची मुख्य भूमिका असलेला 'सुपर ३०' हा चित्रपट गणिततज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत असून चित्रपटाने आतापर्यंत १०४ कोटींचा गल्ला जमावला आहे. हा सिनेमा अनेक राज्यांत करमुक्तही करण्यात आला आहे.
-
After #Bihar, #Rajasthan and #UttarPradesh, #Super30 is now tax-free in #Gujarat.
— taran adarsh (@taran_adarsh) July 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">After #Bihar, #Rajasthan and #UttarPradesh, #Super30 is now tax-free in #Gujarat.
— taran adarsh (@taran_adarsh) July 23, 2019After #Bihar, #Rajasthan and #UttarPradesh, #Super30 is now tax-free in #Gujarat.
— taran adarsh (@taran_adarsh) July 23, 2019
सुरूवातीला बिहार आणि राजस्थाननंतर काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही हा सिनेमा विद्यार्थ्यांसाठी उत्तम उदाहरण असल्याचे सांगत उत्तर प्रदेशातही करमुक्त केला होता. आता गुजरातमध्येही हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे.
हृतिकने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दलची माहिती देत विजय रूपाणी यांचे आभार मानले आहेत. 'आमच्या कष्टाचं फळ आम्हाला देत 'सुपर ३०' करमुक्त केल्याबद्दल चित्रपटाच्या संपूर्ण टीमच्यावतीने तुमचे मनापासून आभार', असं हृतिकनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.