मुंबई - अभिनेता अक्षय कुमारची कोविड -१९चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्याला मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोविडची चाचणी घेण्यापूर्वी अक्षय 'राम सेतू' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होता. सेटवरील क्रू मेंबर्सचीही कोविड-१९ चाचणी घेतली असता ४५ जणांना कोरोनाची लागण झाला असल्याचे उघड झाले आहे.
'राम सेतू' चित्रपटाचे शुटिंग सुरू झाल्यानंतर ५ व्या दिवशी अक्षय कुमारची कोविड चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यानंतर ४५ क्रू मेंबर्सचीही कोविड चाचणी पॉझिटीव्ह आली. मिळालेल्या माहितीनुसार 'राम सेतू' चित्रपटाचे शूटिंग मुंबईच्या मढ आयलँडमध्ये सुरू होते. यासाठी १०० जणांचा क्रू काम करीत होता. यातील ४० ज्यूनियर आर्टीस्टची कोविड १९ चाचणी पॉझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
-
The journey of making one of the most special films for me begins today. #RamSetu shooting begins! Playing an archaeologist in the film. Would love to hear your thoughts on the look? It always matters to me🙏🏻 @Asli_Jacqueline@Nushrratt@Abundantia_Ent@LycaProductions pic.twitter.com/beI6p0hO0I
— Akshay Kumar (@akshaykumar) March 30, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The journey of making one of the most special films for me begins today. #RamSetu shooting begins! Playing an archaeologist in the film. Would love to hear your thoughts on the look? It always matters to me🙏🏻 @Asli_Jacqueline@Nushrratt@Abundantia_Ent@LycaProductions pic.twitter.com/beI6p0hO0I
— Akshay Kumar (@akshaykumar) March 30, 2021The journey of making one of the most special films for me begins today. #RamSetu shooting begins! Playing an archaeologist in the film. Would love to hear your thoughts on the look? It always matters to me🙏🏻 @Asli_Jacqueline@Nushrratt@Abundantia_Ent@LycaProductions pic.twitter.com/beI6p0hO0I
— Akshay Kumar (@akshaykumar) March 30, 2021
क्रू मेंबर्सची पॉझिटिव्ह टेस्ट आल्यानंतर त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ४० ज्यूनियर आर्टीस्ट व इतर अक्षय कुमारची मेकअप टीम व त्याचे सहाय्यक यांचा समावेश आहे. 'राम सेतू'चे शूटिंग अनिश्चित काळासाठी थांबविण्यात आले आहे.
कोरोनाच्या निदानानंतर अक्षय कुमार याने आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोविड चाचणी घेण्याचे आवाहन केले होते. "माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी विनम्र विनंती करतो की त्यांनी स्वत: ची चाचणी करुन घ्यावी आणि काळजी घ्या. लवकरच कामावर परत येईन'', असे अक्षयने म्हटले आहे.
-
what a prestigious start to this epic journey of #RamSetu right from the land of Ayodhya 🙏@akshaykumar @Asli_Jacqueline @Nushrratt @Abundantia_Ent@LycaProductions @vikramix @ShikhaaSharma03#AbhishekSharma #DrChandraprakashDwivedi#CapeOfGoodFilms pic.twitter.com/Z167QKJLZ3
— amazon prime video IN (@PrimeVideoIN) March 19, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">what a prestigious start to this epic journey of #RamSetu right from the land of Ayodhya 🙏@akshaykumar @Asli_Jacqueline @Nushrratt @Abundantia_Ent@LycaProductions @vikramix @ShikhaaSharma03#AbhishekSharma #DrChandraprakashDwivedi#CapeOfGoodFilms pic.twitter.com/Z167QKJLZ3
— amazon prime video IN (@PrimeVideoIN) March 19, 2021what a prestigious start to this epic journey of #RamSetu right from the land of Ayodhya 🙏@akshaykumar @Asli_Jacqueline @Nushrratt @Abundantia_Ent@LycaProductions @vikramix @ShikhaaSharma03#AbhishekSharma #DrChandraprakashDwivedi#CapeOfGoodFilms pic.twitter.com/Z167QKJLZ3
— amazon prime video IN (@PrimeVideoIN) March 19, 2021
संबंधित माहितीनुसार, माधुरी दीक्षित जज असलेल्या डान्स दिवाने या रिअॅलिटी शोच्या सेटवरील १८ लोकांना 30 मार्च रोजी कोरोनाची लागण झाली आहे.
हेही वाचा - बीजापूर चकमक : चारशे नक्षलवाद्यांनी दीड हजार जवानांना घेरुन केला हल्ला; अधिकाऱ्यांची माहिती