ETV Bharat / sitara

'मलंग'च्या पोस्टरमध्ये झळकला 'मसल मॅन' आदित्य रॉय कपूर - Bollywood movie Malang

आदित्य रॉय कपूरने आपल्या दिशा पटानीसोबतच्या आगामी 'मलंग' चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. यात तो आपले शरिरसौष्ठव दाखवताना दिसत आहे.

Aditya Roy Kapoor
आदित्य रॉय कपूर
author img

By

Published : Jan 3, 2020, 6:28 PM IST

मुंबई - आदित्य रॉय कपूरने आपल्या आगामी रिव्हेंज ड्रामा 'मलंग' चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. यात त्याचा लूक अत्यंत वेगळा दिसत आहे. यासोबत चित्रपटाच्या ट्रेलरचीही घोषणा करण्यात आली असून हा येत्या ६ जानेवारील ट्रेलर रिलीज केला जाणार आहे.

आदित्यने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टरमध्ये त्याचे पिळदार शरीर तो सौष्ठव करताना दिसत आहे. 'वेडेपणा बाहेर येऊ द्या', अशा आशयाची टॅगलाईन पोस्टरवर दिसत आहे.

आदित्यने पोस्टर शेअर करीत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''प्रेम शुध्द आहे तर द्वेशही. #मलंग फर्स्ट लूक ट्रेलर ६ जानेवारीला रिलीज होणार.''

यापूर्वी 'मलंग' चित्रपटाच्या एका पोस्टरमध्ये आदित्य रॉय कपूर आणि दिशा पटानीचे फर्स्ट लूक प्रसिध्द करण्यात आले होते. त्याला सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली होती. चित्रपटाच्या रिलीज डेटमध्येही बदल करण्यात आले आहेत.

याशिवाय आदित्यने दिशा पटानीसोबतचे फिचर्ड पोस्टरही प्रसिध्द केलंय. यात दिशाचा कूल आणि सेक्सी अंदाज लक्ष वेधून घेणारा आहे.

या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''प्रेमात आयुष्य एका स्तराहून दुसऱ्या स्तरावर जगले जाते.''

'मलंग' हा चित्रपट व्हॅलेंटाईन डेला १४ फेब्रुवारी रोजी रिलीज करण्यात येणार होता. मात्र आता एक आठवडा अगोददरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल. ७ फेब्रुवारीला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

'मलंग' चित्रपटात आदित्य रॉय कपूरसोबत दिशा पटानी, कुणाल खेमू आणि अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.