मुंबई - बॉलिवूड अभिनेता आणि गायक आदित्य नारायणच्या घरातून एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. आदित्य वडील आणि पार्श्वगायक उदित नारायण आजोबा झाले आहेत. आदित्यने सोशल मीडिया पोस्टमध्ये ही गोड बातमी दिली आहे.
आदित्यने सांगितले की, गेल्या महिन्यात २४ फेब्रुवारीला त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला आहे. या पोस्टसह आदित्यने पत्नी श्वेता अग्रवालसोबतचा एक अतिशय सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आदित्यने 2020 मध्ये श्वेता अग्रवालशी लग्न केले होते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
याआधी आदित्य नारायणने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पत्नी श्वेतासोबतचा एक अतिशय सुंदर फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये श्वेताचा बेबी बंप दिसत होता.
फोटोत दोघेही खूप खुश दिसत होते. यासोबत आदित्यने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'श्वेता आणि मला हे शेअर करताना कृतज्ञ आणि धन्य वाटत आहे, आम्ही लवकरच आमच्या पहिल्या मुलाचे स्वागत करत आहोत.' पूर्वी आदित्य नारायण यांनी एका मुलाखतीत पत्नी श्वेताच्या गरोदरपणाचा खुलासा केला होता.
आदित्य म्हणाला, 'श्वेता आणि मी आमच्या आयुष्याच्या या नव्या सुरुवातीची वाट पाहत आहोत, ही एक पूर्णपणे वेगळी भावना आहे, मला नेहमीच मुलांची खूप आवड आहे आणि मला कधीतरी वडील व्हायचे होते. आता, श्वेताला अधिक काम करावे लागेल, कारण मी लहान मुलापेक्षा कमी नाही. आम्ही नुकतेच एक खोडकर गोल्डन रिट्रीव्हर देखील स्वीकारला आहे. आमचे घर लवकरच ऑक्टेन एनर्जीने फुलणार आहे.
आदित्य पुढे म्हणाला, 'मला मुलीचे खुलेपणाने स्वागत करायचे आहे, कारण वडील मुलींच्या सर्वात जवळ असतात'. आजी-आजोबा होण्याच्या त्याच्या पालकांच्या उत्सुकतेबद्दल आदित्य म्हणाला, "माझे आई-वडील दोघेही आनंदी आहेत की ते लवकरच आजी-आजोबा होणार आहेत, पण आनंद व्यक्त करण्यात माझे वडील (गायक उदित नारायण) माझ्यासारखेच आहेत. थोडे लाजाळू आहेत.
त्याचबरोबर सोशल मीडियावर अनेक चाहते आणि सेलिब्रिटींनी आदित्यला शुभेच्छा पाठवण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा - शुटिंगमध्ये जखमी रणदीप हुडाच्या गुडघ्यावर पार पडली शस्त्रक्रिया