मुंबईः बॉलीवूडमधील लैंगिक अत्याचाराविषयी आदिती राव हैदरी हिने आपली स्पष्ट मते यापूर्वी मांडली आहेत. आता ती या क्षेत्रातील कास्टिंग काउचच्या अस्तित्वाबद्दल बोलली आहे. कलाकारांकडून पुन्हा कास्टिंग काउच आणि उद्योगातून धमकावणे यासारखे धोके दूर करण्याची गरज यावर तिने भर दिला आहे.
नुकत्याच एका आघाडीच्या वेबलोइडला दिलेल्या मुलाखतीत तिच्या नवीन रिलीज झालेल्या 'सुफियुम सुजातायुम' या मल्याळम चित्रपटातील निःशब्द भूमिकेबद्दल सांगितले. तिने ओटीटी आणि थिएटरीकल रिलीजच्या वादावरही भाष्य केले. आदितीने कास्टिंग काउच आणि फिल्म इंडस्ट्रीमधील शोषणाबद्दलही यावेळी सांगितले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
कास्टिंग काउचच्या अनुभवाचा सामना करण्याविषयी विचारले असता आदिती राव हैदरी म्हणाली, "ऐका, हे फक्त माझ्या बाबतीत नाही. असंख्य लोक या विचित्र स्थितीतून गेले आहेत. आमच्यातील काहीजण यातून सहीसलामत बाहेर पडले तर काहींना त्रास झाला. मी भाग्यवान होते. मी त्यातून बाहेर पडले. "
आदित्यने सांगितले होते की, "सर्व काही सोडल्यानंतरही लोक धमकावतात. ते तुम्हाला विविध गोष्टींबद्दल धमकावतात," असे अदिती म्हणाली. तिने या गोष्टींना थारा न दिल्यामुळे तिला आठ महिने काम न करता घरी थांबण्याची वेळ आली होती, हे तिने पूर्वी सांगितले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा - प्रियंका चोप्राने यापूर्वीच सुरू केलंय 'मॅट्रिक्स 4'चे शूटिंग ?
दरम्यान, आदिती या नंतर परिणीती चोप्रा आणि कीर्ती कुल्हारीसमवेत 'द गर्ल ऑन द ट्रेन'मध्ये ऑनस्क्रीन दिसणार आहे. हा गूढ थ्रिलर रिभू दासगुप्ता दिग्दर्शित असून रिलायन्स एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार होत आहे.
हा चित्रपट त्याच नावाच्या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे, जो ब्रिटिश लेखक पॉला हॉकिन्स यांच्या २०१५ मध्ये प्रसिध्द झालेल्या कादंबरीवर आधारित आहे.