ETV Bharat / sitara

'द व्हाईट टायगर'मधील भूमिकेसाठी आदर्श गौरवला 'बाफ्टा'साठी नामांकन

अभिनेता आदर्श गौरव याला 'द व्हाईट टायगर'मधील दमदार अभिनयासाठी बाफटा पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. यासाठी त्याने चित्रपटाचे दिग्दर्शक रामिन बहरानी यांचे आभार मानले आहेत. प्रियंका चोप्रानेही त्याचे कौतुक करताना या नामांकनासाठी तो पात्र असल्याचे म्हटले आहे.

Adarsh Gourav
आदर्श गौरवला 'बाफ्टा'साठी नामांकन
author img

By

Published : Mar 10, 2021, 2:43 PM IST

मुंबई - ब्रिटीश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलीव्हिजन आर्ट (बाफ्टा) अॅवॉर्ड्स २०२१साठी अभिनेता आदर्श गौरव याला नामांकन मिळाले आहे. ‘व्हाईट टायगर’ चित्रपटामधील बलरामच्या व्यक्तिरेखेवर विश्वास व्यक्त केल्याबद्दल आदर्शने चित्रपटाचे दिग्दर्शक रामिन बहरानी यांचे आभार मानले आहेत.

२००८ मध्ये प्रकाशित झालेल्या अरविंद अडीगाच्या पुरस्कारप्राप्त 'द व्हाईट टायगर' कादंबरीवर आधारित याच शीर्षकाचा चित्रपट दिग्दर्शक रामिन बहरानी यांनी साकारला आहे. यात बलराम नावाची व्यक्तीरेखा गौरवने साकारली होती. गौरव व्यतिरिक्त या चित्रपटाला रामिन बहरानीयांनीरुपांतरीत पटकथेसाठी नामांकन मिळाले आहे.

हेही वाचा - 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपट वादात; शीर्षक बदलण्याची आमदार अमिन पटेल यांची मागणी

या गोष्टीचा आनंद व्यक्त करण्यासाठी आदर्श गौरवने इन्स्टग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. रिज अहमद (साऊंड ऑफ मेटल), दिवंगत चाडविक बॉसमन (मा रैनीज ब्लॅक बॉटम), अॅन्थोनी हॉपकिन्स (द फादर), मॅड मिकेलसेन, (द फादर) आणि तहार रहीम (मॉरिटानियन) यांच्यासह २६ वर्षीय आदर्श गौरवची निवड नामांकनासाठी झाली आहे.

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राने ‘व्हाईट टायगर’मध्ये भूमिका साकारली होती. तिनेही इन्स्टाग्रामवर गौरव आणि बहरानी यांचे अभिनंदन केले आहे. या चित्रपटात भूमिका केल्याचा आणि कार्यकारी निर्मी म्हणून काम केल्याचा आपल्याला अभिमान वाटतो असेही प्रियंकाने म्हटलंय.

'व्हाईट टायगर' चित्रपटाचा जानेवारी २०२१मध्ये नेटफ्लिक्सवर प्रीमियर पार पडला होता. यामध्ये राजकुमार राव आणि महेश मांजरेकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा - पीफ्फ : कोरोनामुळे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव लांबणीवर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.