ETV Bharat / sitara

अदा शर्मा 'बासरीवाल्या भैय्या'च्या मदतीसाठी सरसावली

author img

By

Published : Oct 20, 2020, 2:36 PM IST

अभिनेत्री अदा शर्माने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात एक बासरीवाला सुंदर धुन वाजवताना दिसतो. त्याच्याकडून बासरी विकत घ्या, आणि शिका असे, आवाहन अदाने आपल्या चाहत्यांना केलंय.

Ada Sharma
अदा शर्मा

मुंबई - अभिनेत्री आदा शर्मा सोशल मीडियाच्या माध्यमातून एका बासरी वादकाची मदत करण्यासाठी पुढे आली आहे. अदाचे इन्स्टाग्रामवर 50 लाख फॉलोवर्स आहेत. तिने एक व्हिडीओ शेअर केला असून यातील बासरीवाल्या भैय्याला मदत करण्याचे आवाहन तिने चाहत्यांना केले आहे.

अदाने आपल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''बासरीवाल्या भैय्याला भेटा. बासरी विकत घ्या आणि शिकण्यासाठी (मुंबई) येथे संपर्क साधा." तो रिकाम्या रस्त्यावर लॉकडाऊनमध्ये फिरत आहे. सर्व प्रेक्षक घरी बसलेले आहेत. तरीही पूर्ण मनापासून तो बासरी वाजवत आहे. तो यासाठी सक्षम आहे आणि माझ्या सोशल मीडियाच्या मदतीने लाखो लोक त्याला ऐकतील.'',असे ती म्हणाली.

इतरही प्रतिभावान कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या सोशल मीडियाचा वापर करावा, असे आवाहन तिने चाहत्यांना केलंय. "स्वत:चं टॅलेंट दाखवायचे असेल, तर आपण माझ्याबरोबर सहयोग करू शकता, आणि माझे इन्स्टाग्राम वापरू शकता."

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.