नाशिक -अभिनेत्री शिल्पा शेट्टी व पती राज कुंद्रा यांनी आज 4 जानेवारी रोजी दुपारी वणी येथील सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले. शिल्पा शेट्टी गडावर आल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याने मोठ्या संख्येने चाहत्यांनी त्यांना पाहण्यसाठी मंदिर परिसरात गर्दी केली होती.
पॉर्न फिल्मची निर्मिती आणि वितरण केल्याप्रकरणी शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा गेल्या वर्षी अडचणीत आले होते. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी त्यांची तुरुंगातून सुटका झाली. कारागृहातून बाहेर पाऊल टाकताच भावनिक झालेले राज कुंद्रा यांना अश्रू अनावर झाले होते.
यानंतर राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांना यांनी हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील शत्रुनाशिनी माँ बगलामुखी मंदिर बनखंडी येथे त्यांनी एकत्र पूजा केली. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रासोबत चामुंडा देवी मंदिर आणि ज्वालामुखी मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते.आज त्यांनी देवीच्या साडेतीन शक्ती पीठांपैकी अर्धपीठ असलेल्या वणी येथील सप्तश्रृंगी मातेचं दर्शन घेतले. यावेळी मंदिर व्यवस्थापनाने त्यांचं स्वागत केलं.
हेही वाचा - अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज'चे रिलीज अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले