कोरोना काळात सार्वजननिक, घराच्या बाहेर पडल्यावर मुखपट्टी (मराठीत सांगायचं झालं तर ‘मास्क’) घालणे बंधनकारक असून न घातल्यास गुन्हा समजला जाऊन जबर दंड भरावा लागतो. हे झालं सामान्यजनांसाठी पण सेलिब्रिटीजचं काय? सेलिब्रिटीज पण त्यात मोडतात कारण तेही या देशाचेच नागरिक आहेत आणि सर्व कायदे नियम त्यांनाही लागू पडतात. एखादवेळेस आपणही बाहेर पडताना मास्क लावण्यास विसरतो आणि काहीतरी ‘जुगाड’ करून ‘मास्क’ च्या ऐवजी रुमाल वगैरे लावून वेळ मारून नेतो. परंतु जेव्हा सेलेब्रिटी मुखपट्टी लावायला विसरते तेव्हा त्याची लगेच न्यूज बनते आणि त्या व्यक्तीला ट्रोलही केले जाते. असा अनुभव आला ‘नॅशनल क्रश’ असलेली अभिनेत्री रश्मिका मंदानाला.
त्याचं झालं काय की रश्मिका मंदाना आपल्या गाडीतून उतरली आणि एकीकडे जाऊ लागली परंतु पटकन तिच्या लक्षात आले की घाईघाईत तिने तोंडावर मास्कच लावलेला नाहीये. ती ओशाळली व परत आपल्या गाडीकडे वळली आणि तिच्या वाहनचालकाने तिला त्याच्याकडील (नवा) निळ्या रंगाची मुखपट्टी दिली जी तिने त्वरित तोंडावर लावली. मास्क मिळेपर्यंत ती आपले तोंड हाताने झाकत होती आणि तिची त्रेधातिरपीट दिसून येत होती. परंतु नंतर तिने तिचा काळ्या रंगाचा डिझाइनर मास्क लावला आणि डिजिटल मीडियाला बाईट्स दिले.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून बॉलिवूडमध्ये आलेली ही अभिनेत्री आता हिंदी चित्रपटसृष्टीत आपले बस्तान बसवू पहाते आहे. सिद्धार्थ मल्होत्रासोबत ती ‘मिशन मजनू’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करीत असून सध्या ती अमिताभ बच्चन अभिनित ‘गुडबाय’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. रश्मिकाला ‘नॅशनल क्रश’ हा किताब दिला गेला असून ती आतापासूनच हिंदीतही खळबळ माजवेल अशी चर्चा आहे. तिला काही बिग बॅनर्सकडून चित्रपटांच्या ऑफर्स येत असल्यामुळे तिने मुंबईत घरही घेतले आहे.
रश्मिका सोशल मीडियावर नेहमी व्यस्त असते परंतु ती विना-मास्क पकडली गेल्यावर नेटीझन्सनी तिला जबरदस्त ट्रोल केले. तिने हाताने तोंड झाकण्याचा प्रयत्न केल्याने एकाने लिहिले, ‘इस्का ५० रुपया काटो, ओव्हरॲक्टिंग का’, तर दुसऱ्याने लिहिले ‘ओव्हरॲक्टिंग.....त्याने तिला निळा मास्क दिला आणि ही तर आता काळ्या मास्क मध्ये दिसतेय. थोडक्यात हा ‘ड्रामा’ होता तर...’. तर काहींना तिचे असे वागणे ‘क्युट’ वाटले. थोडक्यात या कोरोना काळात सामान्य माणूस असू दे वा सेलिब्रिटी बाहेर पडल्यावर चेहऱ्यावर मुखपट्टी न लावणे गुन्हा तर आहेच परंतु त्यामुळे इतरांना त्रास होऊ शकतो हे लक्षात ठेवले पाहिजे.
या घटनेनंतर यापुढे अभिनेत्री रश्मिका मंदाना, कदाचित, मुखपट्टी लावायला कधीच विसरणार नाही आणि कदाचित, पुढील काही दिवस ती घरातसुद्धा मास्क लावूनच फिरली तर नवल वाटायला नको.
हेही वाचा - 'उरी'ची अभिनेत्री 'ईडी'च्या रडारवर, यामी गौतमची ७ जुलैला होणार चौकशी