ओटीटी माध्यमातील प्रसिध्द अभिनेत्री असलेली किर्ती कुल्हारी हिने नवरा साहिलसोबत वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट टाकत तिने ही माहिती सांगितली आहे.
मी सर्वांना सांगू इच्छिते की, मी आणि पती साहिलने एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त पेपरवर नाही तर खऱ्या आयुष्यातही. कोणासोबत एकत्र राहण्यापेक्षा वेगळे होणे हा सर्वात कठीण निर्णय आहे. मात्र, हे आता बदलू शकत नाही. ज्यांना माझी काळजी आहे त्यांना मी सांगू इच्छिते की, मी ठीक आहे. यानंतर मी यासंदर्भात कोणत्याच गोष्टीवर माझे मत व्यक्त करणार नाही. असे सांगत तिने याबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. फोर मोर शॉट्स, मिशन मंगल, क्रिमीनल जस्टीस या चित्रपट आणि वेब सिरीजमधून प्रसिध्द झालेल्या किर्ती कुल्हारीने चार वर्षापूर्वी साहिल सेहगलशी २०१६ मध्ये लग्न केल होते.