ETV Bharat / sitara

अभिनेत्री दिया मिर्झा लोकांना देत नाही वाढदिवसाची भेटवस्तू! - Dia Mirza birthday gift news

दियाच्या आयुष्यात हिरवळ वा ‘ग्रीनरी’ला अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या लोकांना दिया वाढदिवसाच्या भेटवस्तू देण्याऐवजी त्यांच्या नावाने एक ‘रोपटे’ लावते.

अभिनेत्री दिया मिर्झा लोकांना देत नाही वाढदिवसाची भेटवस्तू

author img

By

Published : Feb 8, 2021, 7:45 AM IST

मुंबई- सर्वांना आपल्या वाढदिवशी वेगवेगळ्या भेटवस्तू मिळत असतात. या भेटवस्तू जर आपल्या प्रियजन, मित्रपरिवाराकडून मिळाल्यावर आनंद द्विगुणित होतो. साधारण व्यक्तींपासून श्रीमंत व सेलिब्रिटीजनासुद्धा भेटवस्तू मिळाल्यानंतरचा आनंद समसमान असतो. गिफ्ट देणाऱ्या व्यक्तीबद्दल प्रेम आणि आदर वृद्धिंगत होतो. परंतु अभिनेत्री दिया मिर्झा लोकांना वाढदिवसाच्या भेटवस्तू अजिबात देत नाही, आणि त्याबद्दल तिला जराही वाईट वाटत नाही अथवा पश्चाताप होत नाही.

दिया मिर्झा वाढदिवसाची भेट वस्तू देत नाही कारण तिला पर्यावरण रक्षण अतिशय महत्वाचे वाटते. आता भेटवस्तू आणि पर्यावरण यांचा संबंध काय? दियाच्या मते, नक्कीच आहे. तिच्या आयुष्यात हिरवळ वा ‘ग्रीनरी’ला अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या लोकांना दिया वाढदिवसाच्या भेटवस्तू देण्याऐवजी त्यांच्या नावाने एक ‘रोपटे’ लावते. एका वर्षी १८०० झाडे लावल्याचे आठवणही तिने काळा घोडा फेस्टिवलच्या चर्चासत्रात बोलताना सांगितली.

या प्रक्रियेमुळे माझे जीवन सोपे झाले आहे. वाढदिवसाला काय गिफ्ट द्यावे, हा विचार करण्याबाबत. वाढदिवस कोणाचाही असो, मी त्याच्या/तिच्या नावाने ११ रोपटी लावते व ती कुठे लावली आहेत, याबद्दलचे सर्टिफिकेट पाठवून देते. ते त्या जागी जाऊन त्या रोपट्यांची वाढ बघू, अनुभवू शकतात. तसेच काही वर्षांनी त्याच झाडांखाली शीतल सावलीत बसून आयुष्यातील दुःख विसरू शकतात.

ती पुढे सांगते की, ‘कित्येक लोकांना मी या भेट दिलेल्या झाडांखाली आनंदाचे क्षण अनुभवताना तसेच रडतानाही पाहिले आहे. काही लोक या भेटवस्तूसाठी तिला कंटाळवाणीही म्हणतात. मात्र, जेव्हा ते ‘ट्री-बँक’ बघतात तेव्हा त्याचे महत्व कळत असल्याचे मत दियाने व्यक्त केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.