मुंबई - अभिनेत्री अमृता राव आणि तिचा पती अनमोल लवकरच आई-बाबा होणार आहेत. अमृताने सोमवारी तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा नववा महिना चालू असल्याचा खुलासा केला.
'आपल्यासाठी हा 10 वा महिना आहे. परंतु आमच्यासाठी 9 वा महिना आहे... सरप्राइज सरप्राइज... अनमोल आणि मी आमच्या नवव्या महिन्यात प्रवेश केला आहे,' असे तिने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे.
![अभिनेत्री अमृता रावने बेबी बंपसह पोस्ट केला फोटो](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9247081_amrita.jpg)
हेही वाचा - फिटनेस जपणाऱ्या रकुलप्रीत सिंगने शेअर केला योग करतानाचा फोटो
ही बातमी उशिरा कळवल्याबद्दल अमृता रावने तिच्या चाहत्यांची माफीही मागितली.
'मी माझ्या मित्र आणि चाहत्यांसमवेत ही गोड बातमी शेअर करत असल्याबद्दल मला फार आनंद झाला आहे. तसेच, मला सर्व लोकांची दिलगिरी व्यक्त करायची आहे. कारण, त्यांच्यापर्यंत मी याआधी ही बातमी पोहचवली नव्हती. मात्र, हे बाळ लवकरच या जगात पाऊल ठेवणार आहे, ही बातमी एकदम खरी आहे' असे तिने म्हटले आहे.
2016 मध्ये अमृता आणि अनमोल विवाहबंधनात अडकले होते.
हेही वाचा - दि व्हाईट टायगर : प्रियांका चोप्रा आणि राजकुमार राव यांचा 'फर्स्ट लुक' रिलीज