ETV Bharat / sitara

Salman Khan : अभिनेता सलमान खानला अंधेरी कोर्टाचे समन्स - अभिनेता सलमानला अंधेरी कोर्टाचे समन्स

अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सलमान खानने पत्रकाराला मारहाण केल्याच्या प्रकरणी अडचणीमध्ये आला आहे. (Actor Salman Khan) अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने सलमान खान विरोधात समन्स जारी केले आहे. दरम्यान, सलमानला (5 एप्रिल)रोजी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहावे लागेल किंवा वकिलांद्वारे प्रतिनिधित्व करावे असे असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

अभिनेता सलमान खान
अभिनेता सलमान खान
author img

By

Published : Mar 23, 2022, 7:30 AM IST

मुंबई - अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सलमान खानने पत्रकाराला मारहाण केल्याच्या प्रकरणी अडचणीमध्ये आला आहे. (Salman Khan Summoned By the Andheri Court) अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने सलमान खान विरोधात समन्स जारी केले आहे. दरम्यान, सलमानला (5 एप्रिल)रोजी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहावे लागेल किंवा वकिलांद्वारे प्रतिनिधित्व करावे असे असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

गुन्हेगारी आणि धमकी दिल्याचा आरोपही केला

सलमानविरोधात पत्रकाराला मारहाण केल्याची तक्रार आहे. पत्रकार अशोक पांडे यांनी ही तक्रार दाखल केलेली आहे. या तक्रारीमध्ये त्यांनी दरोडा, हल्ला, गुन्हेगारी आणि धमकी दिल्याचा आरोपही केला आहे. यावर आता सलमानला प्रत्यक्ष हजर कोर्टात हजर राहावे लागणार आहे. अन्यथा, आपल्या वकिलांमार्फत त्याला आपले प्रतिनिधीत्व करायचे आहे.

आता सलमान स्वत: हजर राहतो की वकील

मुंबईतील अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने (सप्टेंबर 2019)मध्ये सलमानने आणि त्याच्या अंगरक्षकांनी गैरवर्तन केल्याप्रकरणी पत्रकार अशोक पांडे यांनी दाखल केलेल्या प्रकरणात (5 एप्रिल)रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. आता सलमान स्वत: हजर राहतो की आपले वकील हे 5 एप्रील रोजीच समोर येणार आहे.

काय आहे प्रकरण?

सलमान अंधेरीच्या डी. एन. नगर परिसरात सायकल चालवत असताना अशोक पांडे यांनी त्याच्या जवळपास 15 ते 20 मिनीटे पाठलाग करत व्हिडिओ बनवला. यावेळी सलमानसोबत झालेल्या वादामुळे अशोक पांडे यांनी तक्रार दाखल केली. व्हिडिओ बनवत असल्याने सलमानला राग आला. त्यानंतर त्या व्यक्तीचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर आपल्याला शिवीगाळ केली असा आरोपही पांडे यांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.