ETV Bharat / sitara

Prakash Raj Birthday: सडेतोड भाष्य करणारा अष्टपैलू अभिनेता प्रकाश राज - Talented Actor Prakash Raj

दक्षिण आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत आपल्या जबरदस्त अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेता प्रकाश राज आज 26 मार्च रोजी त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहेत. सडेतोड राजकीय मते मांडताना ते कधीही मागे हटत नाहीत.

अभिनेता प्रकाश राज
अभिनेता प्रकाश राज
author img

By

Published : Mar 26, 2022, 11:34 AM IST

अभिनेता प्रकाश राज प्रकाश राज यांचा जन्म 26 मार्च 1965 रोजी बंगळुरू येथे झाला. प्रकाश राज हे हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम चित्रपटांचे अभिनेता, दिग्दर्शक आणि राजकारणी देखील आहेत. तामिळ चित्रपट दिग्दर्शक के बालचंदर यांच्या सांगण्यावरून प्रकाशने आपले नाव बदलून प्रकाश राज ठेवले. प्रकाश राज यांनी आपल्या दमदार अभिनयाने लोकांच्या मनात आपली छाप सोडली आहे. आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले प्रकाश राज यांचे केवळ पडद्यावरच नव्हे तर वास्तविक जीवनातही एक कणखर व्यक्तिमत्त्व आहे. प्रकाश राज यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी.

प्रकाश राज यांनी केवळ खलनायकच नाही तर विनोदी चित्रपटांमध्येही अभिनय करून आपण अष्टपैलू अभिनेता आहोत हे सिद्ध केले आहे. प्रकाश राज यांचे खरे नाव प्रकाश राय आहे, ज्यांना ते तमिळ दिग्दर्शक के.के. बालचंदरच्या सांगण्यावरून बदलले होते.

प्रकाश राज यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात चित्रपटातून नाही तर टीव्ही शोमधून केली होती. त्यांची पहिली आवड नाटक असली तरी प्रकाश राज सुरुवातीच्या काळात पथनाट्यही करायचे. त्यांना थिएटरमध्ये काम करण्यासाठी महिन्याला ३०० रुपये मिळत होते. त्यानंतर 1994 मध्ये 'ड्युएट' या चित्रपटातून त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांची मेहनत आणि समर्पण कामी आले आणि त्यांना एकापाठोपाठ एक अनेक चित्रपट मिळाले.

प्रकाश राज यांनी 1994 मध्ये ललिता कुमारी यांच्याशी पहिले लग्न केले. परंतु 2009 मध्ये दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. यानंतर प्रकाश यांची शूटिंग सेटवर चित्रपट कोरिओग्राफर पोनी वर्मा यांच्याशी भेट झाली आणि दोघे प्रेमात पडले. त्यांनी 2010 मध्ये लग्न केले. प्रकाश हे दोन मुली आणि एका मुलाचे वडील आहेत.

प्रकाश राज हे अनेकदा अनेक मुद्द्यांवर वादग्रस्त विधाने करून जनतेच्या टीकेचे बळी ठरले आहेत. सामाजिक असो की राजकीय, प्रकाश राज आपले स्पष्ट मत मांडायला मागे हटत नाहीत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वक्तव्य करून प्रकाश राज यांनाही ट्रोल करण्यात आले आहे.

हेही वाचा - Archna Puran Singh: अर्चनाच्या नवऱ्याने घरच्यांपासून ४ वर्षे लपवले होते लग्न

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.