मुंबई - सध्या चित्रपटसृष्टीत बायोपिक्स, रिमेक्स आणि सिक्वेल्सची चलती चालू आहे. २०१४ साली मोहित सूरी दिग्दर्शित आणि श्रद्धा कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख अभिनित ‘एक व्हिलन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि हिट ठरला होता. हल्लीच्या चित्रपटसृष्टीच्या ‘कायद्यानुसार’ त्याचा रिमेक बनणे अनिवार्य होते. हल्लीच ‘एक व्हिलन रिटर्न्स’च्या चित्रीकरणाला प्रारंभ झाला व ज्येष्ठ अभिनेता जितेंद्र यांनी नुकतीच चित्रपटाच्या सेटवर हजेरी लावली.
‘एक व्हिलन रिटर्न्स’च्या सेटवर पोहोचला गतकाळचा प्रसिद्ध ‘हिरो’ जितेंद्र! - sequel of 'Ek Villain'
‘एक व्हिलन रिटर्न्स’च्या चित्रीकरणाला प्रारंभ झाला व ज्येष्ठ अभिनेता जितेंद्र यांनी नुकतीच चित्रपटाच्या सेटवर हजेरी लावली. पहिल्या भागाप्रमाणेच याची निर्मिती त्यांची मुलगी एकता कपूर आणि पत्नी शोभा कपूर करीत आहेत. ‘एक व्हिलन रिटर्न्स’ हा मनोवैज्ञानिक थ्रिलर चित्रपट आहे.
‘एक व्हिलन रिटर्न्स’च्या सेटवर जितेंद्र