मुंबई - अभिनेता आयुष शर्मा आणि अर्पिता खान यांच्या आयुष्यात एक नव्या परीचे आगमन झालंय. आयुषने आपला आनंद व्यक्त करत बाळासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. ते आता दुसऱ्या अपत्याचे आई-बाबा झाले आहेत. त्याने या पोस्टसोबत एक भावनिक पोस्टही लिहिली आहे. आयुष अर्पिताच्या या नव्या परीचे नाव अयात असे ठेवण्यात आलंय.
-
Welcome to this beautiful world Ayat. You’ve brought a lot of happiness into our lives. May you touch everyone’s life with a lot of love and joy pic.twitter.com/g9KkDGCgYY
— Aayush Sharma (@aaysharma) December 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Welcome to this beautiful world Ayat. You’ve brought a lot of happiness into our lives. May you touch everyone’s life with a lot of love and joy pic.twitter.com/g9KkDGCgYY
— Aayush Sharma (@aaysharma) December 30, 2019Welcome to this beautiful world Ayat. You’ve brought a lot of happiness into our lives. May you touch everyone’s life with a lot of love and joy pic.twitter.com/g9KkDGCgYY
— Aayush Sharma (@aaysharma) December 30, 2019
आयुष शर्मा आणि सलमानची बहिण अर्पिता खान यांचा २०१४ मध्ये विवाह झाला होता. त्यांना तीन वर्षांचा साहिल हा मुलगा आहे. आता जन्माला आलेली मुलगी अयात हिचा जन्म सलमान खानच्या वाढदिवसाला म्हणजेच २७ डिसेंबर २०१९ ला झाला आहे. हा एक आनंदी योगायोग मानला जात आहे.
यापूर्वी मुलगी झाल्याची बातमी आयुषने एक कार्ड सोशल मीडियावर प्रसिध्द करत सर्वांचे आभार मानले होते. आयुष शर्माने 'लव्हयात्री' या सिनेमात काम केले होते. या सिनेमात त्याची नवतारका वरिना हुसेन हिच्यासोबत जोडी होती. तो आगामी करण ललीत बुटाणी यांच्या रोमँटिक ड्रामा 'क्वाथा' या सिनेमात काम करत आहे. यात त्याची जोडी कॅटरिना कैफची बहिण इसाबेल कैफ हिच्यासोबत आहे. कॅटरिनाची बहिण इसाबेल या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.