ETV Bharat / sitara

अभिनेता अनिल कपूर करणार ग्लोबल सिटीझन लाईव्हचे सूत्रसंचालन - ग्लोबल सिटीझनच्या सीओओ लिसा हेनशॉ

जागतिक महोत्सव ग्लोबल सिटीझन लाईव्हचे यजमान शहर म्हणून मुंबईची निवड झाली आहे. 25 सप्टेंबर रोजी मुंबई जगभरातील प्रसारणाचा भाग असेल आणि भारताचे प्रतिनिधित्व करेल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता अनिल कपूर करणार आहेत.

अभिनेता अनिल कपूर
अभिनेता अनिल कपूर
author img

By

Published : Sep 13, 2021, 8:58 PM IST

मुंबई - सुप्रसिद्ध जागतिक महोत्सव ग्लोबल सिटीझन लाईव्हचे यजमान शहर म्हणून मुंबईची निवड झाली आहे. 25 सप्टेंबर रोजी मुंबई जगभरातील प्रसारणाचा भाग असेल आणि भारताचे प्रतिनिधित्व करेल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता अनिल कपूर करणार आहेत. 2016 मध्ये मुंबईने अखेरचे यजमान शहर म्हणून भूमिका पार पाडली होती.

शो विझक्राफ्टसोबत सह भागीदारीत असणार आहे. यात अमिताभ बच्चन, आयुष्मान खुराना, अर्जुन कपूर, अनन्या पांडे, भूमी पेडणेकर, दिया मिर्झा, फरहान अख्तर, हृतिक रोशन, जान्हवी कपूर, कियारा अडवाणी, रितेश देशमुख, सारा अली खान आणि सोनाक्षी सिन्हा सहभागी होणार आहेत.

ग्लोबल सिटीझन लाईव्हचे उद्दिष्ट भारतातील आणि जी -20 मधील जागतिक तापमानवाढीच्या 1.5 डिग्री सेल्सियसपेक्षा अधिक होण्यापासून रोखून सुसंगत कार्बन उत्सर्जन कमी करणे आहे. विकसनशील देशांच्या हवामानविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी दरवर्षी 100 अब्ज डॉलर्स देण्याचे श्रीमंत देशांकडून हे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, जेव्हा हवामान बदलाचा प्रश्न येतो, तेव्हा होणारे नुकसान भरून काढण्यासाठी आपल्याकडे वेळ संपत आहे. मला खात्री आहे की ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हल जागतिक मंचावर जनआंदोलन घडवेल.

ग्लोबल सिटीझनच्या सीओओ लिसा हेनशॉ म्हणाल्या, “आम्ही पाच वर्षांपूर्वी मुंबईत आमचा पहिला जागतिक नागरिक महोत्सव आयोजित केला होता. मुंबई आणि महाराष्ट्रातील शेकडो हजारो जागतिक नागरिकांच्या प्रतिसादामुळे आणि उत्साही स्वागताने आम्ही चकित झालो. भारतभरातील जागतिक नागरिक आमच्या चळवळीचा एक आवश्यक भाग आहेत. आणि ग्लोबल सिटीझन लाईव्ह साठी मुंबईत परत आल्याचा आम्हाला अभिमान आहे.

हेही वाचन - कोकणातील पारंपरिक गणेशोत्सव ‘रात्रीस खेळ चाले ३’ मालिकेत वेगळ्या अनुभवांसह!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.