मुंबई - आज तेलगू चित्रपटांतील प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अजय देवगणने ट्वीट केले आहे की, "प्रिय गुरू राजामौली तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला जाणून घेणे आणि आरआरआरमध्ये तुमच्याबरोबर काम करणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. सर एस. एस राजामौली यांना नेहमीसाठी हार्दिक शुभेच्छा."
अजय देवगण आणि एस.एस. राजामौली यांनी २०१२ मध्ये आलेल्या 'ईगा' या चित्रपटात एकत्र काम केले आहे. तसेच अजयने त्यांच्या 'ईगा' या हिंदी आवृत्तीतील 'मक्खी'साठीही आवाज दिला आहे.
अजय देवगण आणि एस एस राजामौली आता आठ वर्षांनंतर पुन्हा एकत्र काम करणार आहेत. एस.एस. राजामौलींच्या आगामी आरआरआर चित्रपटात अजय देवगण काम करणार आहे. या सिनेमात अजयसोबत राम चरण, आलिया भट्ट आणि ज्युनियर एनटीआर यांची भूमिका आहे.