ETV Bharat / sitara

आदिनाथ कोठारेची बॉलिवूडमध्ये सुरु झाली घोडदौड - Nagesh Kuknur

आदिनाथ स्वत: निर्माता-दिग्दर्शक ( Actor Adinath Kothare ) असल्याने भूमिकांच्या निवडीबाबत खूप चोखंदळ आणि सजग असतो. त्यामुळेच तर बॉलीवूडमधून सातत्याने ऑफर्स येऊनही त्याने आपल्या डेब्यूसाठी कबीर खान आणि नागेश कुकनूरच्याच कलाकृतींची निवड केली. तो रोहन सिप्पी यांच्या गामी चित्रपटात झळकणार आहे.

आदिनाथ कोठारे इन्स्टाग्राम फोटो
आदिनाथ कोठारे इन्स्टाग्राम फोटो
author img

By

Published : Feb 3, 2022, 5:51 PM IST

मुंबई - महेश कोठारे यांचा ‘छकुला’ आदिनाथ ( Actor Adinath Kothare ) याने मराठी मनोरंजनसृष्टीत उत्तम जम बसविल्यावर आता त्याने बॉलिवूडवर लक्ष केंद्रित केले आहे. अभिनेता आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक आदिनाथ कोठारेचा गेल्या वर्षी बॉलीवूड डेब्यू झाला. कबीर खान दिग्दर्शित 83 ( 83 directed by Kabir Khan ) या बिग बजेट मल्टिस्टारर सिनेमातून आदिनाथ एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसला. तर नागेश कुकनूर ( Nagesh Kuknur ) दिग्दर्शित सिटी ऑफ ड्रिम्स या हिंदी वेबसीरीजमधून त्याने डिजीटल विश्वातही पदार्पण केले. आदिनाथ आता नव्या कोणत्या बॉलीवूड प्रोजेक्टमधून दिसेल याबद्दल तर्कवितर्क सुरु आहेत.

रोहन सिप्पीसोबत आदिनाथ कोठारे
रोहन सिप्पीसोबत आदिनाथ कोठारे

दरम्यान, आदिनाथने एक फोटो शेयर केलाय ज्यावरून त्याच्या चाहत्यांना एक गुड न्यूज मिळण्याची शक्यता वाढली. त्याच्या रोहन सिप्पीसोबत नुकत्याच दिसलेल्या फोटोने आता ही उत्सुकता अधिकच चाळवली आहे. आदिनाथ स्वत: निर्माता-दिग्दर्शक असल्याने भूमिकांच्या निवडीबाबत खूप चोखंदळ आणि सजग असतो. त्यामुळेच तर बॉलीवूडमधून सातत्याने ऑफर्स येऊनही त्याने आपल्या डेब्यूसाठी कबीर खान आणि नागेश कुकनूरच्याच कलाकृतींची निवड केली. रोहन सिप्पी हे नावाजलेल्या दिग्दर्शकांच्या यादीतले एक मोठे नाव आहे, ज्यांना संहितेविषयी उत्तम जाण आहे.

अभिनेता आदिनाथ कोठारे म्हणाला,” होय, मी रोहन सिप्पीच्या नव्या प्रोजेक्टमध्ये तुम्हांला दिसेन. रोहन सिप्पी माझ्या आवडत्या बॉलीवूड दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्यामुळे रोहन सिप्पीच्या प्रोजेक्टचा हिस्सा होणं, नक्कीच सुखद म्हणावे लागेल. सध्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. यंदा हे प्रोजेक्ट रसिकांच्या भेटीला येईल.”

रोहन सिप्पींसोबत आदिनाथ कोठारेने नवे प्रोजेक्ट करणेही त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणायला हवी.

हेही वाचा - ‘बधाई दो' मधील 'अटक गया' गाणे झाले प्रदर्शित!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.