मुंबई - सुपरस्टार आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसने मंगळवारी त्यांच्यावर प्रदूर्षण केल्याच्या आरोपाला उत्तर दिले आहे. लदाखमधील वाखा गावात 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटाचे शुटिंग नुकतेच पार पडले होते. शुटिंग संपल्यानंतर परिसर स्वच्छ न केल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तो दावा प्रॉडक्शन हाऊसने फेटाळून लावला आहे. सध्या आमिर खान लदाखमध्ये अद्वैत चंदन दिग्दर्शन करीत असलेल्या 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटाचे शुटिंग करीत आहे.
-
#LaalSinghChaddha Shooting in Ladakh ♥️
— . (@Aamirian_thug) July 11, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Another Masterpiece On the Way#AamirKhan #NagaChaitanya #LSC #KareenaKapoor #Kargil pic.twitter.com/buM9mh8w8P
">#LaalSinghChaddha Shooting in Ladakh ♥️
— . (@Aamirian_thug) July 11, 2021
Another Masterpiece On the Way#AamirKhan #NagaChaitanya #LSC #KareenaKapoor #Kargil pic.twitter.com/buM9mh8w8P#LaalSinghChaddha Shooting in Ladakh ♥️
— . (@Aamirian_thug) July 11, 2021
Another Masterpiece On the Way#AamirKhan #NagaChaitanya #LSC #KareenaKapoor #Kargil pic.twitter.com/buM9mh8w8P
लदाखच्या वाखा गावातील जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामध्ये प्लास्टिकचा कचरा दिसत होता. युजरचा असा दावा होता की याच ठिकाणी आमिर खानच्या सिनेमाच्या क्रूने शुटिंग केले होते.
आमिर खान प्रॉडक्शनच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केलेल्या निवेदनात टीमने हा आरोप फेटाळून लावला आणि असे लिहिले आहे की शुटिंगची ठिकाणांची पडताळणी अधिकारी करु शकतात. "अशा अफवा आहेत की आम्ही जिथे शूट केले तो परिसर आम्ही स्वच्छ केला नाही. हा आरोप आम्ही पूर्णपणे खोडून काढत आहोत. आमचे लोकेशन स्थानिक अधिकाऱ्यांसाठी नेहमीच कधीही तपासणी करण्यासाठी खुले असते." असे प्रॉडक्शन हाऊसने प्रसिध्द करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
- — Jigmat Ladakhi 🇮🇳 (@nontsay) July 10, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
— Jigmat Ladakhi 🇮🇳 (@nontsay) July 10, 2021
">— Jigmat Ladakhi 🇮🇳 (@nontsay) July 10, 2021
प्रॉडक्शन हाऊसने यावर जोर दिला की शूटिंगच्या ठिकाणी आणि आसपास स्वच्छतेसाठी आमची टीम “कडक प्रोटोकॉल” पाळते. "आमच्याकडे एक टीम आहे जी लोकेशन नेहमी कचरा मुक्त ठेवण्यासाठी कार्यरत असते. शेवटच्या दिवशी आम्ही संपूर्ण लोकेशनची पुन्हा तपासणी करतो. शूटिंग शेड्यूलच्या अखेरच्या दिवशी जागा सोडण्यापूर्वी संपूर्ण लोकेशन स्वच्छ आहे किंवा नाही याची खात्री करुन घेतो किंवा तसे आढळल्यास स्वच्छ करुन घेतो."
- — Aamir Khan Productions (@AKPPL_Official) July 13, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
— Aamir Khan Productions (@AKPPL_Official) July 13, 2021
">— Aamir Khan Productions (@AKPPL_Official) July 13, 2021
आमिर खान, करिन कपूर खान, मोना सिंग आणि नागा चैतन्य यांची मुख्य भूमिका असलेला 'लालसिंग चड्ढा' हा चितर्पट टॉम हॅन्क्सचा 1994 चा ब्लॉकबस्टर 'फॉरेस्ट गंप'चा अधिकृत हिंदी रिमेक आहे.
हेही वाचा - बॉलिवूड 'क्वीन'ची OTT एन्ट्री : टेंम्प्टेशन आयलँडच्या शोची होस्ट बनणार कंगना रणौत