ETV Bharat / sitara

HBD Aamir Khan : आमिर खानला त्याच्या वाढदिवसानिमित्त किरण रावकडून मिळाले सर्वोत्तम गिफ्ट - आमिर खान बेस्ट गिफ्ट

आमिर खान आणि किरण राव यांनी लग्नाच्या १५ वर्षानंतर घटस्फोट घेतला. जेव्हा या जोडप्याने सोशल मीडियावर घटस्फोटाची घोषणा केली तेव्हा त्यांच्या चाहत्यांसाठी ही बातमी खरोखरच धक्कादायक होती. आता आमिर खानने सांगितले की, किरण रावने त्याला वाढदिवसाचे सर्वोत्तम गिफ्ट दिले आहे.

आमिर खान आणि किरण राव
आमिर खान आणि किरण राव
author img

By

Published : Mar 14, 2022, 10:32 AM IST

मुंबई - बॉलीवुड सुपरस्टार आमिर खान 14 मार्च रोजी 57 वर्षांचा झाला आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फॅन्स सोशल मीडियावर त्याला भरभरून शुभेच्छा देत आहेत. त्याचबरोबर बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्याच्या खास मित्रांनीही आमिरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आमिर खानने बॉलिवूडवर तीन दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवले आहे. त्याच्या हिट चित्रपटांची यादी मोठी आहे. पत्नी किरण रावपासून घटस्फोट घेतल्यानंतर आमिर खानने गेल्या वर्षी सोशल मीडियावर याची घोषणा केली होती. आता आमिर खानने खुलासा केला आहे की त्याची माजी पत्नी किरण रावने त्याला वाढदिवसाची आतापर्यंतची सर्वोत्तम भेट दिली आहे.

मीडियातील एका बातमीनुसार, एका मुलाखतीत आमिर खानने माजी पत्नी किरण रावबद्दल मोठा खुलासा केला आहे. आमिरने सांगितले की, माजी पत्नी किरण रावने त्याला आतापर्यंतचे सर्वोत्तम वाढदिवसाचे गिफ्ट दिले आहे. आमिरने सांगितले की, अलीकडेच त्याची माजी पत्नी किरण रावशी संभाषण झाले आणि त्याने किरणला त्याच्या स्वतःतील कमतरता आणि कमकुवतपणाची यादी देण्यास सांगितले ज्या तो सुधारू शकेल.

आमिर म्हणाला, 'तिने मला 10 ते 12 गुणांची यादी दिली आहे, याची नोंद मी माझ्याकडे ठेवली आहे. त्यामुळे माझ्यासाठी वाढदिवसाची ही सर्वोत्तम भेट आहे'. आमिरने पुढे सांगितले की, ''किरणने त्याच्या कमतरता आणि कमकुवतपणाची जी यादी दिली आहे त्यामुळे तो आश्चर्यचकित झाला आहे. आमिर म्हणाला, 'म्हणूनच मला वाटतं, ही माझी वाढदिवसाची सर्वोत्तम भेट आहे, तिने माझ्यातील उणीवा अतिशय सुंदर आणि प्रामाणिकपणे सांगितल्या आहेत ज्या मला आजपर्यंत कोणीही सांगितल्या नव्हत्या.''

विशेष म्हणजे आमिर खान आणि किरण राव यांनी लग्नाच्या १५ वर्षानंतर घटस्फोट घेतला. जेव्हा या जोडप्याने सोशल मीडियावर घटस्फोटाची घोषणा केली तेव्हा त्यांच्या चाहत्यांसाठी ही बातमी खरोखरच धक्कादायक होती.

आमिर खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो अभिनेता एडविट चंदनच्या 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आमिर आणि करीना कपूर खान पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट यावर्षी 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे.

हेही वाचा - क्रिती सेनॉनला दाखवलेल्या स्त्री दाक्षिण्यामुळे सिध्दार्थ मल्होत्रावर नेटिझन्स फिदा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.