ETV Bharat / science-and-technology

Chat GPT : भविष्यात गुगलला टक्कर देणारे चॅट जीपीटी नेमके आहे तरी काय ? कसा करावा उपयोग ? जाणून घ्या सविस्तर - कसा करावा चॅट जीपीटीचा उपयोग

टेक दुनियेत सध्या चॅट जीपीटी या शब्दाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे चॅट जीपीटी नेमके आहे तरी काय याची उत्सुकता यूजरला लागली आहे. मात्र चॅट जीपीटी मोफत आहे की, त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत, हा प्रश्नही यूजरला भेडसावत आहे. त्यामुळे चॅट जीपीटीबाबतच्या सगळ्या प्रश्नांची आम्ही तुम्हाला या लेखात उत्तले दिली आहेत.

Chat GPT
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jan 20, 2023, 4:25 PM IST

हैदराबाद - भविष्यात गुगलला टक्कर देणाऱ्या चॅट जीपीटी सध्या सोशल माध्यमात चांगलेच ट्रेंड होत आहे. टेक जगात चॅट जीपीटी या नावाने सध्या चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मात्र नेमके चॅट जीपीटी नेमके काय आहे. त्याचा उपयोग काय आहे. गुगलपेक्षा दोन पावले पुढे असलेल्या या चॅट जीपीटीचे कार्य कसे चालते. या चॅट जीपीटीचे दुरुपयोग काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत. तर चला जाणून घेऊया काय आहो चॅट जीपीटी ?

आर्टिफिशियल इंटेलिजेंस चॅटबॉक्स : चॅट जीटीपी हे एक आर्टिफिशियल इंटेलिजेंस चॅटबॉक्स आहे. जे आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे काही सेकंदात देते. या चॅट जीपीटीवर आपल्याला गुगलसारखेच सगळ्या प्रशनांची उत्तरे मिळतात. त्यामुळे गुगलसारखेच ते एक सर्च इंजिन म्हणूनही काम करते. विशेष म्हणजे चॅटजीपीटी हे गुगलपेक्षाही दोन पावले पुढ असलेले सर्च इंजिन असल्याचेही बोलले जाते. त्यामुळेच ते सध्या ट्रेंड करत आहे.

ओपन एआयने बनवले चॅटजीपीटी : सध्या ट्रेंड करत असलेले चॅट जीपीटी हे आर्टिफिशियल इंटेलिजेंस चॅटबॉक्स बनवणाऱ्या ओपन एआय या कंपनीने बनवलेले आहे. चॅट जीपीटीचे फिचर खूपच अॅडव्हांस आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रश्नांच्या उत्तरासाठी इंटरनेट यूजर चॅटजीपीटीचा उपयोग करतात. विशेष म्हणजे विकिपीडियापेक्षाही चॅटजीपीटी जास्त सुविधाजनक असल्याचे बोलले जात आहे.

कसे देते प्रश्नांची उत्तरे : आर्टिफिशियल इंटेलिजेंस चॅटबॉक्स बनवणाऱ्या कंपनीने चॅटजीटीपी हे फिचर बनवले आहे. त्यामुळे त्यामध्ये चांगलेच अॅडव्हांस फिचरचा समावेश आहे. मात्र हे काम कसे करते, हा सगळ्यात मोठा प्रश्न यूजरला भेडसावत आहे. त्याचे उत्तर अगदी सोपे आहे. चॅटजीपीटी उत्तर देण्यासाठी प्रश्नांना नैसर्गिक भाषेत प्रोसेसिंग ( NLP ) करते. त्याची बांधणीच अशी करण्यात आलेली आहे की, ते ह्युमन लाईक टेक्स जनरेट करु शकते. इतकेच नाही, तर चॅट जीपीटी भाषा ट्रान्सलेशन करुन त्याचे संक्षिप्त रुपातही भाषांतर करते. त्यामुळे आपल्याला प्रश्नांची उत्तरे सुटसुटीत मिळतात. म्हणून यूजर चॅट जीपीटीकडे आकर्षित होत आहेत.

कसा करावा चॅट जीपीटीचा उपयोग : चॅट जीपीटी खूपच सुविधाजनक बनवण्यात आलेलेल आहे. मात्र अद्यापही कंपनीने आपले अॅप बाजारात लाँच केले नाही. त्यामुळे सध्यातरी यूजरला वेबपेजला भेट देऊनच चॅटजीपीटीचा वापर करावा लागतो. त्यासाठी यूजरला chat.openai.com या वेबपेजला भेट द्यावी लागते. या पेजला भेट दिल्यानंतर यूजरला आपला मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी शेअर करुन लॉग इन करावे लागते. त्यानंतर चॅटजीपीटीचे होम पेज ओपन होते. चॅट जीपीटीचे होम पेज ओपन झाल्यानंतर इथे सर्चचे ऑप्शन दिसून येते. सर्च बारवर आपण आपला प्रश्न टाकून सर्च करू शकतो. त्यानंतर काही सेकंदात आपल्याला आपल्या प्रश्नांचे उत्तर मिळते.

काय नाही करु शकत चॅट जीपीटी : गुगलला टक्कर देणाऱ्या या चॅट जीपीटीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र चॅट जीपीटीचेही काही कमकुवत दुवे आहेत. चॅट जीपीटी हे 2021 च्या अगोदर बनवण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये 2021 च्या अगोदरची सगळी माहिती फिड केलेली आहे. त्याच्यानंतरची माहिती त्यामध्ये नाही. त्यामुळे ते 2021 च्या नंतरची माहिती नाही देऊ शकत. चॅट जीपीटी हे एक मशीन लर्निंग बेस्ड चॅटबॉक्स आहे. त्यामुळे त्यामध्ये जितकी माहिती फिड केली आहे, त्याचेच ते उत्तर देते.

1) चॅट जीपीटीच्या चॅट बोटला आपला कॉमन सेंस नाही. जी माहिती त्याच्या आत फिड केले आहे केवळ तीच माहिती चॅट जीपीटी आपल्याला देऊ शकते.

2) चॅट जीपीटी कोणत्याही म्हणी समजू शकत नाही. त्याला फक्त इंग्रजी भाषा अवगत आहे. त्यामुळे इतर भाषेतील माहिती त्याला अद्यापही फिड केलेली नाही.

3) विशेष एक्सप्रेशन आणि आपला आवाज हे चॅटजीपीटी समजू शकत नाही. हे एक टेक्स्ट बेस्ड मॉडल आहे. त्यामुळे आपली फिलींग ते नाही समजू शकत.

4) जो डाटा चॅट बोटमध्ये फिड केला आहे, केवळ त्याचीच माहिती तो देतो. त्यामुळे चॅटबॉक्स क्रिएटीव्ह नाही होऊ शकत. त्यासह आपल्याला कोणतीही मदत चॅट जीपीटी नाही करु शकत. किवा कोणतेही निर्णय नाही घेऊ शकत. चॅट जीपीटी विडंबनात्मक भाषाही समजू शकतो.

चॅट जीपीटीला मोजावे लागणार पैसे ? : सध्या चॅट जीपीटीची सोशल माध्यमात चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र चॅट जीपीटी आल्यापासून काही फेक अॅपचाही सुळसुळाट झाला आहे. त्यामाधयमातून नागरिकांना फसवण्याची शक्यता आहे. त्यामुळे चॅट जीपीटी मोफत आहे की त्यासाठी पैसे मोजोवे लागणार आहेत याची चर्चा रंगली आहे. मात्र चॅट जीपीटी बिल्कूल मोफत आहे. त्याचा कोणीही उपयोग घेऊ शकते. आपल्या मोबाईलवरही चॅट जीपीटी आपण वापरु शकतो. त्यासाठी chat.openai.com या साईटला लॉग इन करावे लागते.

एलन मस्कने केली होती कंपनीची सुरुवात : चॅट जीपीटी बनवणाऱ्या ओपन ओआय या कंपनीची सुरुवात एलन मस्क यांनी सैम अल्टमैन यांच्यासोबत 2015 मध्ये केली होती. मात्र त्यानंतर एलन मस्क त्या कंपनीपासून दूर झाले. सध्या ओपन ओआय या कंपनीला मायक्रोसॉफ्ट कंपनीचे समर्थन असल्याचेही बोलले जाते. यूजरच्या प्रश्नांची लगेच उत्तरे देत असल्याने चॅट जीपीटी सध्या सोशल माध्यमात ट्रेंडींगला आहे.

हेही वाचा - Misinformation on Social Media : सोशल मीडिया साइट्सची निष्काळजी, चुकीच्या माहितीसाठी रिवार्ड्सचा लोभ जबाबदार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.