वॉशिंग्टन : संगीत ऐकल्याने व्यक्तीच्या मनावर चांगलेच परिणाम होत असल्याचे दिसू येत आहे. मात्र संगीत ऐकणे आणि संगीताचा सराव करण्यामुळे वृद्धांमध्ये स्मरणशक्तीची घट होण्यापासून रोखू शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे. संगीतामुळे वृद्धांमध्ये निरोगी लक्षणे दिसून आल्याचेही युनिव्हर्सिटी ऑफ जिनिव्हा आणि ईपीएफएलच्या संशोधकांनी स्पष्ट केले आहे. हे संशोधन न्यूरो इमेजमध्ये प्रकाशीत करण्यात आले आहे.
निवृत्त नागरिकांवर केले संशोधन : प्रगतीशील संज्ञानात्मक घट सामान्य वृद्धत्वाशी संबंधित असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. तथापि, ही प्रक्रिया पुढे ढकलण्यासाठी आपण आपल्या मेंदूला प्रशिक्षित करू शकतो का? याबाबत संशोधकांनी संशोधन केले. या संशोधकांनी संगीताचा सराव आणि ऐकणे ग्रे मॅटरचे उत्पादन वाढवून निरोगी ज्येष्ठांमध्ये संज्ञानात्मक घट कमी करू शकते. हे परिणाम साध्य करण्यासाठी संशोधकांनी 100 हून अधिक निवृत्त नागरिकांवर संशोधन केले. या नागरिकांनी यापूर्वी कधीही संगीत वाजवले नव्हते. सहा महिने ते पियानो आणि संगीत वर्गात सहभागी झाले होते. हे निष्कर्ष निरोगी वृद्धत्वाला चालना देण्यासाठी नवीन मार्ग उघडत असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे.
वय वाढल्यामुळे मेंदूची प्लॅस्टिकिटी होते कमी : आपल्या आयुष्यात आपला मेंदू स्वतःला पुन्हा तयार करतो. मेंदूचे आकारविज्ञान, कनेक्शन आणि वातावरण अनुभवांनुसार बदलतात. मात्र जसजसे आपले वय वाढते, तसतसे मेंदूची प्लॅस्टिकिटी कमी होत जाते. मेंदू देखील राखाडी पदार्थ गमावतो, तिथे आपले न्यूरॉन्स स्थित असतात. याला ब्रेन अॅट्रोफी असे म्हणत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. त्यामुळे हळूहळू एक संज्ञानात्मक घट दिसून येते. अनेक प्रक्रियांच्या केंद्रस्थानी कार्यरत असलेली स्मृती ही संज्ञानात्मक कार्यांपैकी एक आहे. वर्किंग मेमरी ही अशी प्रक्रिया म्हणून परिभाषित केली जाते. त्यामध्ये लक्ष्य साध्य करण्यासाठी माहिती थोडक्यात राखून ठेवून हाताळत असल्याचेही संशोधकांनी स्पष्ट केले. यात दूरध्वनी क्रमांक लिहून ठेवण्यासाठी पुरेसा लक्षात ठेवणे किंवा परदेशी भाषेतील वाक्याचे भाषांतर करणे, यांचा समावेश होत असल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे.
स्मरणशक्तीवर होतो सकारात्मक प्रभाव : संगीताचा सराव केल्यामुळे आणि संगीत ऐकल्यामुळे स्मरणशक्तीची हानी टाळता येते. अशा क्रियाने मेंदूच्या प्लॅस्टिकिटीला प्रोत्साहन दिले असून ते ग्रे मॅटर व्हॉल्यूम वाढण्याशी संबंधित होते. संगीत ऐकल्याने कार्यरत स्मरणशक्तीवर देखील सकारात्मक प्रभाव मोजला गेला आहे. हे संशोधन 62 ते 78 वयोगटातील 132 निरोगी सेवानिवृत्त नागरिकांवर करण्यात आले. मेंदूमध्ये संगीताच्या शिक्षणाशी संबंधित प्लॅस्टिकिटीचे कोणतेही चिन्ह अद्याप दिसून न आलेल्या या नागरिकांवर हे संशोधन करण्यात आले.
कार्यक्षमता सहा टक्क्यांनी वाढल्याचा दावा : एखाद्याच्या आयुष्यादरम्यानचा एक छोटासा शिकण्याचा अनुभवही मेंदूवर छाप सोडत असल्याचा दावा जिनिव्हा स्कूल ऑफ हेल्थ सायन्सेसचे संशोधक डेमियन मेरी यांनी केला आहे. या संशोधनात सहा महिन्यांनंतर आम्हाला समान परिणाम आढळले. न्यूरोइमेजिंगने सर्व सहभागींमध्ये उच्च स्तरीय संज्ञानात्मक कार्यामध्ये गुंतलेल्या मेंदूच्या क्षेत्रांमध्ये राखाडी पदार्थात वाढ झाल्याचे दिसून आले. त्यांची कार्यक्षमता 6 टक्क्याने वाढल्याचा दावा जिनेव्हा स्कूल ऑफ हेल्थ सायन्सेसच्या प्राध्यापक तथा संशोधक क्लारा जेम्स यांनी केला.
हेही वाचा - Tick Infection Affects Brain Cell : टिक इन्फेक्शनचा मेंदूतील विविध पेशींवर होतो परिणाम, विषाणू मेंदूतील पेशींना करतो संक्रमीतं