सॅनफ्रान्सिस्को- टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क हे मेंदू आणि मशीनमध्ये जोडणारी कंपनी न्यूलिंकबाबतची 28 ऑगस्टला मोठी घोषणा करणार आहेत. न्यूरोलिंकच्या चिपची उंदीर आणि माकडांवर चाचणी घेतल्यानंतर मानवी चाचणीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
एलॉन मस्क हे काय घोषणा करणार याबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत आहे. मात्र, न्यूरॉनलिंकच्या चिपचे लाईव्ह प्रक्षेपण होणार असल्याचे निश्चित आहे.
मस्क यांनी 2016 मध्ये न्यूरोलिंक कंपनीची स्थापना केली आहे. त्यांनी गेल्या महिन्यात ट्विट करत न्यूरॉनलिंकबाबत माहिती दिली होती. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की न्यूरॉनलिंक हे रिअल टाईमममध्ये कसे काम करतात, 28 ऑगस्टला दाखविणार आहे. मॅट्रिक्समध्ये मॅट्रिक्स आहे, असे मस्क यांनी ट्विट केले आहे.
मानवाला ऐकू न येणारे आवाज ऐकणे न्यूरोलिंक चिपमुळे वापरकर्त्याला शक्य होते, असा मस्कने दावा केला होता. न्यूरोलिंक चिपमुळे आपल्याला थेट संगीत ऐकणे शक्य होते का, असा प्रश्न एका वापरकर्त्याने ट्विटरवर विचारला. तेव्हा ते शक्य असल्याचे मस्क यांनी उत्तर दिले होते.
काय आहेत न्यूरॉनलिंकच्या चिपच्या फायदे
- मेंदुत बसविण्यात येणाऱ्या न्युरोलिंकच्या चीपमुळे संप्रेरकाचे संतुलन करणे शक्य होत असल्याचा दावा मस्क यांनी केला. त्यामुळे तणावातून दिलासा मिळू शकतो.
- मेंदुचे विकार आणि पक्षाघात झालेल्या व्यक्तींना डिव्हाईसवर नियंत्रण करणे न्यूरोलिंकमुळे शक्य होते.
- भविष्यात ही चीप वायरलेस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वाचन करणे, मेंदुला सिग्नल मिळविणे शक्य होणार आहे.
- त्याचा मेंदुच्या रोगामध्ये भविष्यात वापर होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
- न्यूरोलिंकमधून मेंदुचे विकार जाणून घेणे, मेंदुची कार्यक्षमता वाढविण्याचे हेतू असल्याचे मस्क यांनी गतवर्षी लाँचिगच्या कार्यक्रमात सांगितले होते.