ETV Bharat / science-and-technology

New AI Model GPT 4: Open AI ने नवीन एआय मॉडेल असलेल्या जीपीटी 4 ची केली घोषणा ; फोटोसह मजकूर स्वीकारणार - चॅट जीपीटी

मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपल्या चॅट जीपीटीचे नवीन मॉडेल विकसित केले आहे. हे मॉडेल यूझरने दिलेल्या फोटो आणि मजकूरचे इनपूट स्वीकारत असल्याचा कंपनीने दावा केला आहे.

Open AI
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 15, 2023, 5:06 PM IST

सॅन फ्रान्सिस्को : मायक्रोसॉफ्टची मालकी असलेल्या Open AI ने त्यांचे नवीन मल्टीमॉडेल GPT-4 जाहीर केले आहे. या मॉडेलमध्ये फोटो आणि मजकूर अपलोड करता येतो. जीपीटी ४ हा ओपन एआयसाठी मैलाचा दगड असल्याचे कंपनीने आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये मंगळवारी स्पष्ट केले आहे. या प्रकल्पासाठी कंपनीने तब्बल सहा महिने काम केल्याचेही स्पष्ट केले आहे.

नवीन मॉडेल असेल अधिक विश्वासार्ह : चॅट जीपीटीचे हे नवीन मॉडेल अधिक विश्वासार्ह असल्याचा दावा कंपनीने केला आहे. GPT-3.5 च्या तुलनेत नवीन AI मॉडेल अधिक विश्वासार्ह आणि कठीण सूचना हाताळण्यास सक्षम असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. GPT-4 विद्यमान भाषा मॉडेल्स (LLMs) पेक्षा जास्त कामगिरी करते. यात बहुतेक अत्याधुनिक (SOTA) मॉडेल्स समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे बेंचमार्क आणि अतिरिक्त प्रशिक्षण पद्धती समाविष्ट असणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

26 पैकी 24 भाषात चॅट जीपीटीची सरस कामगिरी : मायक्रोसॉफ्ट कंपनीने चाचणी केलेल्या 26 पैकी 24 भाषांमध्ये GPT-4 ने GPT-3.5 पेक्षा सरस कामगिरी केली आहे. यात कमी वापरात येणाऱ्या भाषांचाही समावेश असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. सपोर्ट, सेल्स, कंटेंट मॉडरेशन आणि प्रोग्रामिंग यासारख्या फंक्शन्सवर मोठा प्रभाव टाकून कंपनी हे नवीन मॉडेल अंतर्गत वापरत असल्याचेही मायक्रोसॉप्ट कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

शब्दाचा पुढील अंदाज लावण्यात तरबेज : मायक्रोसॉफ्टने अपडेट केलेले जीपीटी ४ हे मॉडेल मजकूर आणि फोटो हे दोन्हीही प्रॉम्प्टपणे स्वीकारू शकते. त्यामुळे वापरकर्त्यांना कोणत्याही भाषेत कार्य करण्यास अनुमती देते. जीपीटी 4 बेस मॉडेल हे पूर्वीच्या जीपीटी मॉडेल्सप्रमाणे पुढील शब्दाचा अंदाज लावण्यात तरबेज असल्याचा दावा कंपनीने केला आहे. जीपीटी ४ हे मॉडेल उपलब्ध डेटा वापरून प्रशिक्षित करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. चॅट जीपीटी ४ हे chat.openai.com वर GPT 4 अ‍ॅक्सेस वापरण्याच्या कॅपसह मिळणार आहे. तर डेव्हलपर GPT-4 API च्या वेटलिस्टसाठी साइन अप करू शकतात, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - NASA Captures Star On Cusp Of Death : मृत्यूच्या उंबरठ्यावरील तारा नासाच्या दुर्बिणीत झाला कैद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.