ETV Bharat / science-and-technology

New tool For Earthquakes : नवीन टूल भविष्यातील भूकंपाबाबत अंतर्दृष्टी करू शकते प्रदान, टेक्सासच्या संशोधकांनी केला 'हा' दावा

author img

By

Published : Feb 21, 2023, 6:18 PM IST

टेक्सास विद्यापीठीतील संशोधकांनी भूकंपाबाबतची माहिती शोधून काढली आहे. या संशोधनानुसार भविष्यात किती मोठा भूकंप होऊ शकतो, त्याबाबतची माहिती मिळण्याचा दावा या संशोधकांनी केला आहे.

New tool For Earthquakes
संग्रहित छायाचित्र

हुस्टन : भौतिकशास्त्राच्या रोजचा घडामोडी मोठा भूकंप होण्याचा उलगडा शोधण्याचा मौल्यवान मार्ग ठरू शकतो. हुस्टन येथील टेक्सास विद्यापीठातील संशोधकांनी दोन खडकाच्या ब्लॉकमधील भूकंप किती झोनला धक्का बसवू शकते, याबाबतचे संशोधन केले आहे. त्यामुळे या संशोधनामुळे किती मोठा भूकंप होऊ शकतो याबाबतची माहिती या संशोधकांकडून मिळू शकते.

सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे अभ्यास : एखादी जड पेटी हलवत ठेवण्यापेक्षा तिला हलवायला जास्त मेहनत का घ्यावी लागते, हे स्पष्ट करणारी ही घटना असल्याचे या संशोधकांनी स्पष्ट केले आहे. भूकंपानंतर पृष्ठभाग किती लवकर एकमेकांशी जोडले जातात, याला नियंत्रित करत असल्याचेही यावेळी संशोधकांनी स्पष्ट केले. याबाबतचा अभ्यास सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेला आहे. या अभ्यासात जो खडक बाजुला होण्यासारखा आहे, तो कोणतीही मोठी हानी न करता बाजुला होतो. मात्र जो खडक चिकटून बसतो, त्याच्यात मोठी हानी करण्याची शक्यता असते. त्यामुळे या संशोधनातून भूकंपाबाबतची सविस्तर माहिती संशोधकांना मिळू शकते.

भूकंपाची कारणांसह शक्यता तपासण्यासाठी मौल्यवान मार्ग : या एकाच शोधातून शास्त्रज्ञांना पुढचा मोठा भूकंप कधी होईल हे सांगता येणार नाही. कारण मोठ्या भूकंपामागील कार्यकारणभावाची प्रक्रिया खूप गुंतागुंतीची असते, असेही या संशोधकांनी सांगितले आहे. मात्र तरीही हा अभ्यास मोठ्या हानीकारक भूकंपाची कारणांसह शक्यता तपासण्यासाठी एक मौल्यवान नवीन मार्ग सूचवत असल्याचेही ते म्हणाले.

किती वेळा भूकंपाच्या घटना घडू शकतात याची चाचणी : जॅक्सन स्कूल ऑफ जिओसायन्सेसच्या टेक्सास इन्स्टिट्यूट फॉर जिओफिजिक्स विद्यापीठाचे संचालक डेमियन सेफर यांनी जगभरातील सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या दोषांवर समान भौतिकशास्त्र आणि तर्कशास्त्र लागू केले पाहिजे असे म्हटले आहे. योग्य नमुने आणि फील्ड निरीक्षणांसह आम्ही आता पॅसिफिक नॉर्थवेस्टमधील कॅस्केडिया सारख्या इतर प्रमुख घटनांवर किती मोठे आणि किती वेळा भूकंपाच्या स्लिप घटना घडू शकतात याबद्दल चाचणी करण्यायोग्य अंदाज बांधणे सुरू करू शकतो असेही डेमियन सेफर यावेळी म्हणाले.

या संशोधकांनी न्यूझीलंडच्या किनार्‍यावरील चांगल्याप्रकारे अभ्यासलेल्या घटनांतील खडक आणि संगणक मॉडेल एकत्रित करून एक चाचणी तयार केली. त्यामुळे संशोधकांनी निरुपद्रवी प्रकारचा स्लो मोशन भूकंप दर काही वर्षांनी होईल, असे या चाचणीतून यशस्वीरित्या शोधून काढले. याबाबत त्यांनी आतमध्ये चिकणमाती समृद्ध खडक आहेत. चाचणी केलेल्या खडकांचे नमुने न्यूझीलंडमधील एका घटनेमुळे समुद्राच्या तळाखाली सुमारे अर्धा मैलांवरून ड्रिल केले गेल्याची माहितीही यावेळी सेफर यांनी दिली.

भूकंपाचा धक्का बसण्याची शक्यता असल्याची मिळते माहिती : संशोधकांनी हायड्रॉलिक प्रेसमध्ये फॉल्ट झोन खडक पिळून काढल्यानंतर तो खूप सहज घसरल्याचे दिसून आले. यावेळी संशोधकांनी रॉक डेटाला फॉल्टच्या कॉम्प्युटर मॉडेलमध्ये प्लग केले. यावेळी त्याचा परिणाम दर दोन वर्षांनी एक लहान, स्लो-मोशन हादरा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा हादरा न्यूझीलंडच्या घटनेतील निरीक्षणाशी अगदी अचूक जुळत असल्याचेही संशोधकांच्या लक्षात आले. त्यामुळे या संशोधकांना चिकणमाती समृद्ध खडक भूकंपाचे नियमन करत असण्याची शकता असल्याचे वाटत आहे. ज्यामुळे प्लेट्स शांतपणे एकमेकांच्या पुढे सरकतात आणि तणाव निर्माण होण्यास मर्यादा येत असल्याचेही संशोधकांचे मत आहे.

संशोधकांनी केलेल्या या शोधाचा उपयोग हानीकारक भूकंपांमध्ये भेग घसरण्याची शक्यता आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी केला जाऊ शकतो. याबाबतचे मत टेक्सास इन्स्टिट्यूट फॉर जिओफिजिक्स विद्यापीठाचे संलग्न संशोधक अभ्यासक श्रीशरण श्रीधरन यांनी स्पष्टपणे मांडले आहे. यामुळे आम्हाला भूकंपाचा अंदाज व्यक्त करता येत नाही, परंतु भूकंपाचा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे की नाही याबाबतची माहिती मिळत असल्याचे उटाह स्टेट युनिव्हर्सिटीचे सहाय्यक प्राध्यापक म्हणाले.

हेही वाचा - Testing Mind Controlled Computing On Humans : माणसाचे मन कंट्रोल करण्यासाठी संगणकीय चाचणी: जेफ बेझोस, बिल गेट्स करत आहेत ब्रेन इम्प्लांट स्टार्टअपवर काम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.