ETV Bharat / science-and-technology

'राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस' 2023; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व - Pollution Control Day

National Pollution Control Day 2023 : भोपाळ गॅस दुर्घटनेनंतर हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. यंदा 39 वा 'राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस' आहे. जाणून घ्या तो साजरा करण्याचं कारण आणि प्रदूषण कमी करण्याचे मार्ग काय आहेत.

National Pollution Control Day 2023
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 1, 2023, 12:14 PM IST

हैदराबाद : कोणत्याही दिवसाचं आयोजन करण्यामागे छोटी-मोठी कारणं असू शकतात, परंतु भारतात प्रत्येक दिवसाला खूप महत्त्व दिलं जातं. यामध्ये राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाचाही समावेश आहे. हा दिवस दरवर्षी 2 डिसेंबर रोजी साजरा केला जातो आणि या दिवसाचा मुख्य उद्देश प्रदूषण रोखण्याबद्दल जागरूकता वाढवणं हा आहे.

'राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस' म्हणजे काय? 'राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस' किंवा राष्ट्रीय प्रदूषण प्रतिबंध दिवस भारतात दरवर्षी 2 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी प्रदूषण नियंत्रण उपाय आणि आपत्ती टाळण्यासाठी जनजागृती केली जाते. 1984 च्या भोपाळ गॅस दुर्घटनेत ज्यांनी प्राण गमावलं त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.

'राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवसा'चा इतिहास काय आहे? 'राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस' जाणून घेण्यासोबतच राष्ट्रीय प्रदूषण दिनाचा इतिहास समजून घेणं आवश्यक आहे. भोपाळमधील गॅस दुर्घटना ही भारताच्या इतिहासातील सर्वात भीषण आपत्ती मानली जाते. 1984 मध्ये 2 आणि 3 डिसेंबरच्या रात्री मध्य प्रदेशातील युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेडमध्ये मिथाइल आयसोसायनेटची गळती झाली. या गळतीमुळे 3 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. लाखो लोक प्राणघातक वायूच्या संपर्कात आले. तेव्हापासून हा दिवस औद्योगिक आपत्ती टाळण्यासाठी आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो.

पर्यावरण स्वच्छ कसे ठेवावे :

  • सायकलचा वापर : वाहनांमधून निघणारा धूर हे वायू प्रदूषणाचं प्रमुख कारण आहे. सायकलचा अधिक वापर करण्याचा प्रयत्न करा. मुलांना सायकलनं शाळेत जाता येत असेल तर तुम्ही गाडी घेऊ नका. त्याचबरोबर वैयक्तिक वाहनाऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करा.
  • विजेचा वापर कमी करणं : ज्या इंधनातून आपल्या घरात वीज येते ते वायू प्रदूषणाला हातभार लावतात. गरज नसताना वीज वापरू नका. गरज असेल तेव्हाच दिवे, पंखे, एसी किंवा कुलर वापरा. या सवयी मुलांमध्ये सुरुवातीपासूनच लावा.
  • रोप लावणे : तुम्ही तुमच्या बाल्कनीत किंवा घराच्या अंगणात रोपे लावू शकता. याच्या मदतीनं तुम्ही विषारी हवा स्वच्छ करण्यात हातभार लावाल तर स्वच्छ हवाही निर्माण कराल.
  • धूर कमी करणे: धुम्रपान करून, कोळसा, फटाके किंवा लाकूड जाळल्यानं वायू प्रदूषण वाढतं. विशेषत: दिवाळीनंतर डोक्यावर धुराचे लोट येऊ लागतात. या छोट्या गोष्टी मोठ्या समस्यांचं कारण बनतात. हे टाळा आणि आपलं वातावरण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा.

हेही वाचा :

  1. मांजरी प्रजातींचा प्राणघातक शिकारी, जाणून घ्या जॅग्वार दिवसाबद्दल
  2. सीमा सुरक्षा बल स्थापना दिवस 2023; जाणून घ्या जगातील सर्वात मोठ्या 'सुरक्षा बला'ची कहानी
  3. 'जागतिक एड्स दिन' 2023; जाणून घ्या यावर्षीच्या 'जागतिक एड्स दिना'ची थीम आणि इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.