ETV Bharat / science-and-technology

Google AI Update : मायक्रोसॉफ्टची मोठी घोषणा, बींज सर्चमध्येच ॲड करणार चॅटजीपीटी

मायक्रोसॉफ्टने मंगळवारी दुपारी 1 वाजता एक न्युज इवेंट योजित करण्याची घोषणा केली आहे. प्रामुख्याने त्याच्या ओपनएआय भागीदारीवर आणि बींज सर्च चॅटजीपीटीवर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे. आता चॅटजीपीटीला टक्कर देण्यासाठी गुगल देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स 'बार्ड' नावाचा चॅटबॉट लॉन्च करण्याची तयारी करत आहे.

Google AI Update
चॅटजीपीटीला टक्कर देण्यासाठी गुगल 'बार्ड' नावाचा चॅटबॉट करणार लॉन्च
author img

By

Published : Feb 7, 2023, 5:18 PM IST

सॅन फ्रान्सिस्को : द व्हर्जच्या मते, इव्हेंटच्या निमंत्रणात असे म्हटले आहे की मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला काही रोमांचक प्रकल्पांवरील प्रगती समाविष्ट करतील. शिवाय, मायक्रोसॉफ्टने $10 बिलियन करारामध्ये ओपनएआय भागीदारी वाढवल्यानंतर काही दिवसांनी हे आमंत्रण आले आहे. त्यामुळे ते ओपनएआयसाठी खास क्लाउड भागीदार बनले आहे. अहवालात पुढे नमूद केले आहे की, मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड सेवा उत्पादने, एपीआय सेवा आणि संशोधनावरील सर्व ओपनएआय वर्कलोडला सामर्थ्य देतील.

ओपनएआय मॉडेल्सचा समावेश करण्याचा मानस : मायक्रोसॉफ्टचा स्वतःच्या ग्राहक आणि एंटरप्राइझ उत्पादनांमध्ये विविध ओपनएआय मॉडेल्सचा समावेश करण्याचाही मानस आहे. बींज व्यतिरिक्त, ओपनएआय तंत्रज्ञान वर्ड, पॉवरपॉइंट आणि आउटलुकमध्ये जोडले जाईल, अशा अफवा आहेत, असे अहवालात म्हटले आहे. टेक जायंटने अलीकडेच ओपनएआयद्वारे समर्थित वैशिष्ट्यांसह मायक्रोसॉफ्ट टीम्स प्रीमियम लाँच केले.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सामर्थ्याचा वापर : गुगल 8 फेब्रुवारी रोजी एक कार्यक्रम आयोजित करणार आहे. त्यामध्ये ते आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील कामाबद्दल शेअर करेल. द वर्जला पाठवलेल्या आमंत्रणानुसार, लोक कसे माहिती शोधतात, एक्सप्लोर करतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात याची पुनर्कल्पना करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सामर्थ्याचा वापर करून, तुम्हाला जे हवे आहे ते शोधण्यासाठी ती पूर्वीपेक्षा अधिक नैसर्गिक आणि अंतर्ज्ञानी बनवते, असे कंपनीने म्हटले आहे.

काय आहे गुगल बार्ड? : गुगल नव्याने सुरु करत असलेले गुगल बार्ड हे LaMDA आणि Google च्या स्वतःच्या संभाषणात्मक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चॅटबॉटवर आधारित आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी गुगल बार्डला प्रायोगिक संभाषणात्मक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सेवा असे म्हटले आहे. Google येत्या आठवड्यात सर्व लोकांसाठी अधिक व्यापकपणे ही गुगल बार्डची सेवा उपलब्ध करून देणार असल्याचेही पिचाई यांनी सांगितले आहे.

गुगल बार्डचा वापर कसा करायचा? : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी केलेल्या ब्लॉग पोस्टनुसार सध्या, Google Bard सर्व लोकांना चाचणीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. परंतु निवडक वापरकर्त्यांना टेस्टिंगसाठी याचा वापर करता येत आहे. Google लवकरच LAMDA ची लाइटवेट मॉडेल आवृत्ती जारी करणार आहे. या सुविधेसाठी कॉम्प्युटरची पॉवर अत्यंत कमी लागणार आहे. या लाइटवेट मॉडेल आवृत्तीत या सुविधेचा वापर करणारे गुगलला त्यांचे फीडबॅक देऊ शकतील.

गुगल बार्डविषयी काय म्हणाले सुंदर पिचाई? : पिचाई म्हणाले की, आम्ही LaMDA द्वारे समर्थित प्रायोगिक संभाषणात्मक AI सेवेवर काम करत आहोत. ज्याला आम्ही Bard म्हणत आहोत. येत्या काही आठवड्यांमध्ये ही सेवा अधिक व्यापकपणे लोकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही एक पाऊल पुढे टाकत आहोत. बार्ड आपल्या मोठ्या भाषेच्या मॉडेल्सच्या सामर्थ्य, बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलतेसह जगाच्या ज्ञानाची व्याप्ती एकत्र करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.