नाशिक : नाशिक जिल्ह्यात तीव्र उन्हाचा तडाखा जाणवत आहे. लोड शेडिंगचा फटका औषधांवर देखील होतो. काही विशेष औषधांचे तापमान स्थिर ठेवण्यासाठी औषध विक्रेत्यांना कसरत करावी लागत आहे. महाराष्ट्राच्या इतर शहरांसह नाशिक जिल्ह्यात मागील महिन्यापासून उन्हाचा तडाखा जाणवत आहे. नाशिकचे तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवले जात आहे. अशाच नाशिक शहरासह जिल्ह्यात लोडशेडिंगचा फटका औषध विक्रेत्यांना बसत आहे.
काही विशेष औषध (इंजेक्शनचे) यांचे तापमान 25 ते 30 डिग्री पर्यंत स्थिर ठेवण्यासाठी औषध विक्रेत्यांना कसरत करावी लागत आहे. अनेक मेडिकल दुकानात औषधांचे टेम्प्रेचर मेंटेन करण्यासाठी फ्रीजची सुविधा आहे. मात्र, लोडशेडिंगमुळे विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने फ्रिज मधील तापमानावर परिणाम होत आहे. अशात औषध विक्रेते विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत औषधे आईस पॅडवर ठेऊन तापमान स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
औषधांचा प्रभाव होतो कमी
लहान मुलांचे इंजेक्शन, एमोक्सीसिलीन, इरिथ्रोमाइसिन, सिप्रोफ्लोक्सोसिन सीरप सारखे अन्य इंजेक्शन, सिरप यांचे तापमान 25 ते 30 डिग्री पर्यंत स्थिर ठरवणे गरजेचे असते. अशात औषध विक्रेत्यांच्या किंवा ग्राहकांच्या हलगर्जीपणामुळे हे औषध उन्हात किंवा सामान्य तापमानात ठेवल्यामुळे औषधांचा प्रभाव कमी होतो.