हैदराबाद : केवळ पुढच्या पिढीतील शास्त्रज्ञ अभियंते आणि नवोदितांनाच नव्हे तर शालेय विद्यार्थी आणि सामान्यतः देशातील लोकांनाही प्रेरणा देण्याच्या उद्देशानं, इस्रोने इस्रोच्या अधिकृत वेबसाईटसह विविध प्लॅटफॉर्मद्वारे या लँडिंगचं थेट कव्हरेज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे. या ऐतिहासिक क्षणात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी अवकाश संस्थेनं देशभरातील शाळा आणि शैक्षणिक संस्थांना आमंत्रणही दिलंय. इस्रोने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग साध्य करण्यासाठी तयार असलेल्या चंद्रयान-3 मोहिमेसह भारताच्या अंतराळ संशोधनाने एक उल्लेखनीय टप्पा गाठलायं. हे यश भारतीय विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि उद्योगासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, जे आपल्या देशाच्या अवकाश संशोधनातील प्रगतीचे प्रतीक आहे.
अनेक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध : 23 ऑगस्ट 2023 रोजी 17:27 वाजता होणार्या या ऐतिहासिक घटनेचे थेट प्रक्षेपण केले जाईल. लाइव्ह कव्हरेज ISRO वेबसाइट, यूट्यूब, फेसबूक आणि डीडी नॅशनल टीव्ही चॅनेल यासह अनेक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल, असं निवेदनात म्हटलंय. चंद्रयान-३ चे सॉफ्ट लँडिंग हा एक महत्त्वाचा क्षण आहे जो केवळ उत्सुकता वाढवतो असं नाही तर आपल्या तरुणांच्या मनात शोध घेण्याची उत्कट इच्छा देखील जागृत करतो. आम्ही एकत्रितपणे भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या पराक्रमाचा उत्सव साजरा करतो तेव्हा ते अभिमान आणि एकतेची गहन भावना निर्माण करतं. हे वैज्ञानिक चौकसता आणि नावीन्यपूर्ण वातावरणाला चालना देण्यास हातभार लावेल, असं निवेदनात म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांना या ऐतिहासिक कार्यक्रमात सक्रिय भूमिका बजावण्यासाठी आमंत्रित करण्यात आलंय. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आणि प्राध्यापकांमध्ये या कार्यक्रमाची सक्रियपणे प्रसिद्धी करण्यासाठी आणि संस्थेच्या आवारातच चंद्रयान 3 सॉफ्ट लँडिंगचे थेट प्रसारण आयोजित करण्यासाठी संस्थांना आमंत्रित केलंय.
नावीन्यपूर्ण संस्कृतीला चालना : या कार्यक्रमाचे महत्त्व केवळ वैज्ञानिक समुदायापुरतेच मर्यादित नाही तर देशभरातील लोकांनाही उत्सुकता आहे. चंद्रयान 3च्या सॉफ्ट लँडिंगमध्ये वैज्ञानिक, अभियंते आणि संशोधकांच्या पुढच्या पिढीला प्रेरणा देण्याची क्षमता आहे. ज्यामुळे वैज्ञानिक चौकसता आणि नावीन्यपूर्ण संस्कृतीला चालना मिळते. त्याचबरोबर या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या सर्वांना सॉफ्ट लँडिंगपर्यंत, ISRO ने चंद्रयान-3 अंतराळयानाच्या विक्रम लँडरने टिपलेल्या चंद्राच्या मनमोहक प्रतिमा शेअर केल्या आहेत. लँडर हॅझार्ड डिटेक्शन अँड अवॉयडन्स कॅमेरा (LHDAC) द्वारे शक्य झाले आहे. ISRO अंतर्गत स्पेस अॅप्लिकेशन सेंटर (SAC) द्वारे विकसित केलेलं, LHDAC उतरण्याच्या टप्प्यात धोकादायक अडथळे ओळखून सुरक्षित लँडिंग साइट सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. यशस्वी लँडिंग भारताला युनायटेड स्टेट्स, रशिया आणि चीन सारख्या राष्ट्रांच्या रांगेत सामील करेल. त्यांनी यापूर्वी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केलंय.
हेही वाचा :