टेक डेस्क - आजच्या काळात स्मार्टफोन, संगणक, लॅपटॉप, टॅब या सगळ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काळ जसजसा बदलत आहे तसेच लोकही अॅडव्हान्स होत चालले आहेत. सोप्या भाषेत बोलायचे झाल्यास डिजीटल इंडियाचे स्वप्न प्रत्यक्षात हळूहळू आकार घेत आहे. मात्र काही युझर्स टेक्नॉलॉजीचा वापर करतात पण काही चुकाही करतात ज्यामुळे त्यांचे नुकसान होते.
जर तुम्ही लॅपटॉप युझर असाल तर काही गोष्टींची खबरदारी घेणे तुम्हाला अतिशय गरजेचे आहे. अन्यथा याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. टेक्नॉलॉजीच्या तज्ज्ञांनी लॅपटॉपसंबंधी काही सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे पालन केल्यास तुम्ही तुमचा लॅपटॉप हॅकर्सपासून सुरक्षित ठेवू शकता.
क्रेडिट कार्ड नंबर
जर तुमच्या लॅपटॉपमध्ये क्रेडिट कार्ड नंबर सेव्ह आहे तर एकप्रकारे तुम्ही हॅकर्सला आमंत्रण देत आहात. सामान्यत: बहुतांश लोक गुगल क्रोमचा वापर करतात. अशावेळी कोणतेही ऑनलाईन व्यवहार करताना कार्डला सेव्ह करण्याचा विकल्प मिळतो. अनेक जण या ऑप्शनला ओके करतात. जर तुम्ही असे केले असेल तर त्वरित क्रोमच्या सेटिंग्समध्ये जाऊन पेमेंट डिटेल त्वरित डिलीट करा. डिलीट करण्यासाठी गुगलच्या अॅडव्हान्स सेटिंगमध्ये जा.
बँक स्टेटमेंट
जर तुमचे बँकेत खाते असेल तर दर महिन्याला तुम्हाला बँकेकडून पीडीएफच्या रुपात ई-मेल येत असणार. अनेकदा तुम्ही ते डाउनलोड केले असतील आणि ते डाउनलोड फोल्डरमधून डिलीट केले नसणार. तर त्वरित या फोल्डरमध्ये जाऊन त्याला डिलीट करा अन्यथा हॅकर्स कधी पण तुमच्या खात्यातले पैसे पळवू शकतात.
वैयक्तिक माहिती
जर लॅपटॉपमध्ये तुम्ही मोबाईल नंबर, घराचा पत्ता, जन्मतारीख, पूर्ण नाव सेव्ह केले असेल तर ते डिलीट करा. तुमच्या या वैयक्तिक माहितीद्वारे फेक प्रोफाईल बनवण्यात येऊ शकतो. त्यामुळे वैयक्तिक माहिती लॅपटॉपमध्ये सेव्ह न करणे कधीही उत्तम.
छायाचित्र
जर तुम्ही वैयक्तिक फोटो सेव्ह ठेवले असतील तर ते डिलीट करा. तुमचे फोटो नोटरीमध्ये व्हेरिफाय करुन कोणीही खोटे कागदपत्र तयार करू शकतो. अन्यथा कोणीही तुमच्या फोटोचे बनावट ओळखपत्र बनवून चुकीचे काम करू शकतो. ज्यामुळे तुम्ही संकटात सापडू शकता.