नवी दिल्ली - कोरोना महामारीमुळे एकीकडे जग ऑनलाईन व्यवहार आणि कामकाजाकडे वळत असताना सायबर हल्ल्यांचे देशातील प्रमाण वाढले आहे. भारतामधील संस्थांवर सर्वाधिक रॅनसमवेअरचे हल्ले करण्याचा प्रयत्न झाल्याचे अहवालामधून समोर आले आहे. वर्षभरापासून दर आठवड्याला देशातील संस्थांवर सरासरी २१३ रॅनसमवेअरचे हल्ले झाले आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा रॅनसमवेअरच्या हल्ल्यांचे प्रमाण १०२ टक्क्यांनी वाढले आहे. त्यामध्ये कोणतीही घट होत नसल्याचेही दिसून आले आहे.
- वर्षाच्या प्रारंभी सर्वाधिक रॅनसमवेअरचे हल्ले उत्तर अमेरिकेमधील आरोग्य संस्थांवर झाले आहेत.
- रॅनसेमअरच्या हल्ल्यातर भारतानांतर अर्जेंटिना, चिली, फ्रान्स आणि तैवान या देशांचा क्रमांक राहिला आहे.
- आशियाई पॅसिफिक खंडामध्ये विमा व कायदेशीर संस्थांवर हल्ल्यांचे सर्वाधिक प्रमाण राहिले आहे. तर आफ्रिकेमध्ये वित्तीय आणि बँकिंगवरील रॅनसमवेअर हल्ल्यांचे प्रमाण सर्वाधिक राहिले आहे.
सायबर गुन्हेगारांनी रुग्णांकडून केली होती पैशाची मागणी
वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या रॅनसमवेअरचा हल्ला चकित करणारा ठरला होता. आरोग्य सेवा पुरवठादारांकडून आणि रुग्णांकडून पैशांची मागणी करण्यात आली होती. जर पैसे मिळाले नाही तर थेरपीचे रिपोर्ट ऑनलाईन प्रसिद्ध करण्याची सायबर गुन्हेगारांंनी रुग्णाला ई-मेलमधून धमकी दिली होती.
दरम्यान, अँटी रॅनसमवेअरचे हल्ले रोखण्यासाठी काळजी घेण्याचे अहवालातून अधोरेखित करण्यात आले आहे.