ETV Bharat / science-and-technology

Twitter Removal Of Legacy Verification : ट्विटरने ब्लू मार्क काढल्याने सुरू झाला गोंधळ; माहितीची सत्यता पडताळणीबाबत साशंकता

ट्विटरने ब्लू मार्क काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सेलिब्रिटी, पत्रकार आणि राजकारण्यांच्या खात्यावरुन लेगेसी ब्लू चेकमार्क गायब झाल्यामुळे वापरकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण होऊ लागला आहे.

Twitter Removal Of Legacy Verification
संग्रिहत छायाचित्र
author img

By

Published : Apr 21, 2023, 5:22 PM IST

हैदराबाद : ट्विटरने गुरुवारी आपल्या धोरणात बदल करुन ब्लू मार्क काढून टाकले आहेत. त्यामुळे अनेक सेलिब्रिटींसह पत्रकारांच्या खात्यावरील ब्लू मार्क काढून टाकण्यात आले आहेत. मात्र त्यामुळे माहितीची सत्यता असण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. एलन मस्कने नोव्हेंबर 2022 मध्ये ट्विटर खरेदी केल्यापासून ट्विटरला फायदेशीर कंपनी बनवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

ब्लू मार्क आहे स्टेटस सिम्बॉल : एलन मस्क यांनी अगोदर एक एप्रिलपासून ब्लू चेक मार्क काढण्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर त्यांनी ही मुदत 20 एप्रिलपर्यंत वाढवली होती. त्यामुळे 20 एप्रिलपासून ट्विटरने ब्लू मार्क काढून टाकण्यास सुरूवात केली आहे. एलन मस्कने ट्विटर ताब्यात घेण्यापूर्वी वापरकर्त्यांच्या खात्यांचे सत्यापन सार्वजनिक हिताचे होते. त्यामुळे चिन्हांकित करण्यात आलेले राजकारणी, पत्रकार, अभिनेत्यांच्या खात्यांची पडताळणी करत होते. ब्लू चेकने वापरकर्त्यांच्या खात्याला सत्यता प्रदान करण्यात येत होती. मात्र आता या पडताळणीशी तडजोड करण्यात आलेली आहे. ब्लू चेकमार्क हे स्टेटस सिम्बॉल असल्याचा एलन मस्कचा यांचा असा विश्वास आहे. त्यामुळे त्यासाठी कोणीही पैसे मोजायला तयार होणार असल्याचेही मस्क यांचे मत आहे.

ट्विटरवर बरीच खाती आहेत स्पॅम : ट्विटरने ब्लू चेक मार्क काढून टाकण्यास सुरूवात केली आहे. ट्विटरने ब्लू मार्कसाठी आयफोन आणि अँड्रॉइड फोनसाठी दरमहा 8 डॉलर आकारले आहेत. मात्र भारतातील वापरकर्त्यांना दरमहा 900 रुपये आकारण्यात आले आहेत. याला अनेक प्रसिद्ध पत्रकारांसह प्रसारमाध्यमांनी विरोध केला होता. मात्र एलन मस्क यांनी आपल्या धोरणात बदल केला नाही. मात्र ट्विटरवरील अनेक खाते स्पॅमसारखी माहिती अपलोड करतात. त्यामुळे ब्लू मार्क काढल्याने अशी चुकीची माहिती प्रसारित होण्याचा धोका आहे. काही वापरकर्त्यांनी प्रख्यात सेलिब्रिटीच्या नावाने खाती काढली आहेत. त्यामुळे ब्लू मार्क काढल्याने अशाप्रकारचे कृत्य आणखी वाढणार असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा - Scientists Develop Mini Heart : अहो आश्चर्यम . . शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत मिनी हार्ट केले विकसित, जाणून घ्या कसे करते काम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.