ETV Bharat / science-and-technology

Fish Gets Rainbow Shimmer : या छोटाशा पारदर्शी माशांच्या अंगावर अवतरतो इंद्रधनुष्य, जाणून घ्या काय आहे कारण

थायलंडच्या नदीत आढळणाऱ्या माशांच्या पारदर्शी त्वचेवर इंद्रधनुष्याचे रंग अवतरत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हा मासा फक्त थायलंडच्या नदीतच आढळून येत असून त्याला कॅटफिश असे म्हटले जाते.

author img

By

Published : Mar 14, 2023, 1:35 PM IST

Fish Gets Rainbow Shimmer
संग्रहित छायाचित्र

न्यूयॉर्क : सध्या नागरिकांना आपल्या छोट्याशा मत्सालयात छान गोल्ड फिश असावे असे वाटते. त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात छोटेशे मत्सालय असते. मात्र थायलंडमधील एका छोट्याशा मत्सालयातील पारदर्शी मासा पोहताना त्याच्या अंगावर इंद्रधनुष्य चमकत असल्याने चांगलाच चर्चेत आला आहे. त्यामुळे कॅटफिश प्रकारातील या माशाच्या अंगावर इंद्रधनुष्य का अवतरतो याचे शास्त्रीय कारण शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे.

थायलंडच्या नदीत आढळतात कॅटफिश : कॅटफिश या थायलंडच्या नदीत मोठ्या प्रमाणात आढळून येतात. या माशांच्या अंगावर सुर्यप्रकाश पडल्यानंतर त्यांच्या अंगावर इंद्रधनुष्य चितारला जातो, असे शास्त्रज्ञांनी सोमवारी राष्ट्रीय अकादमीच्या जर्नलमध्ये प्रकाशीत केलेल्या पत्रकात याबाबतची माहिती दिली आहे. सुर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर हा मासा आपल्या पारदर्शी नाजूक त्वचावर असलेल्या विशिष्ट स्ट्रक्चरला हलवतो. त्यामुळे त्याच्या त्वचेवर इंद्रधनुष्य निर्माण होत असल्याचे या शास्त्रज्ञांचे मत आहे. त्याच्या या पारदर्शी त्वचेमुळेच या माशाला ग्लास फिश असेही संबोधतात. फक्त थायलंडच्या नदीत आढळणाऱ्या या माशाची लांबी काही सेंटीमिटर लांब असल्यानेही त्या आकर्षीत असल्याचे दिसून येते.

फुलपाखराच्या पंखावरही दिसतात रंग : कॅटफिश या माशांच्याच नाहीतर इतर प्राण्यांच्या अंगावर देखील चमकणारे इंद्रधनुष्य दिसू शकते. मात्र त्यासाठी त्यांनी काहीतरी हालचाल केल्यानंतरच ते दिसून येतात. या पक्षांकडे चमकदार बाह्य पृष्ठभाग असलेली त्वचा असते. त्यामुळे त्यावर प्रकाशाचे किरण पडल्यानंतर ते परावर्तीत होतात. हमिंगबर्डचे पंख किवा फुलपाखराच्या पंखावर असे रंग दिसून येत असल्याचे ऍरिझोना स्टेट विद्यापीठाचे जीवशास्त्रज्ञ रॉन रुटोव्स्की यांनी स्पष्ट केले.

कॅटफिश पोहताना करते स्नायू ढिले : कॅटफिश मासा पोहत असताना तो आपले स्नायू ढिले करतो. त्यामुळे त्यावर पडणारा सुर्यप्रकाश विशिष्ट पद्धतीने वाकला जातो. पारदर्शी असलेल्या कॅटफिशच्या स्नायूमध्ये असलेल्या रचनेमुळे त्यावर इंद्रधनुष्य अवतरल्या जात असल्याची माहिती चीन येथील शांघाय जिओ टोंग विद्यापीठातील भौतिकशास्त्रज्ञ किबिन झाओ यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी मत्स्यालयाच्या दुकानात कॅटफिश हे मासे पाहिल्यानंतर आपण मोहित झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संशोधकांना प्रयोगशाळेत त्याच्या शरीरावर लेसर चमकवल्यानंतरही अशा प्रकारचे रंग आढळल्याची माहिती त्यांनी दिली.

जोडीदारांना आकर्षित करण्यासाठी देतात संकेत : कॅटफिशच्या नाजूक अंगावर इंद्रधनुष्य अवतरल्याने शास्त्रज्ञांना याबाबतचे मोठे आव्हान निर्माण झाल्याचे दिसून आले. मात्र बाहेरील प्रकाशाच्या जवळपास 90 टक्के प्रकाश टाकणारी त्वचा माशांकडे आवश्यक असल्याचे मत झाओ यांनी व्यक्त केले आहे. माशाची त्वचा इतकी पारदर्शक नसल्यास आपण रंग पाहू शकणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. काही प्रजाती जोडीदारांना आकर्षित करण्यासाठी संकेत देणारा विक्षिप्तपणा करतात असेही झाओ यांनी सांगितले. मात्र कॅटफिशवर अवतारणारे इंद्रधनुष्याचे रंग हा उद्देश पूर्ण करतात की नाही हे अद्याप स्पष्ट नसल्याचेही रुटोव्स्की यांनी यावेळी सांगितले आहे.

हेही वाचा - Wildfires Can Erode Ozone Layer : जंगलातील वणव्यामुळे ओझोनचा थर धोक्यात, सूर्याच्या अतिनिल किरणांचा बसू शकतो फटका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.