बीजिंग : कमी ऐकू आल्यानंतरही श्रवणयंत्राचा वापर न करणाऱ्या नागरिकांना स्मृतिभ्रंश होण्याचा धोका जास्त असतो. मात्र श्रवणयंत्रे स्मृतिभ्रंशाविरुद्ध लढण्यास मदत करू शकतात असा दावा संशोधकांनी केला आहे. याबाबतचे संशोधन द लॅन्सेट पब्लिक हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. चीनमधील शानडोंग विद्यापीठातील प्राध्यापक डोंगशान झू यांनी याबाबतचा दावा केला आहे.
श्रवणयंत्रामुळे कमी होतो स्मृतिभ्रंशाचा धोका : स्मृतिभ्रंश आणि श्रवणशक्ती कमी होणे ही वृद्धांमध्ये असलेल्या सर्वसामान्य स्थिती आहे. श्रवणशक्ती कमी होणे हे जगभरातील 8 टक्के स्मृतिभ्रंशाच्या प्रकरणांशी जोडलेले आहे. त्यामुळे श्रवणदोष दूर करणे हा स्मृतिभ्रंशाचा जागतिक भार कमी करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. श्रवणशक्ती कमी होणे हा मध्यजीवनातील स्मृतिभ्रंशासाठी सर्वात प्रभावी बदल करण्यायोग्य धोका असू शकतो. परंतु स्मृतिभ्रंशाचा धोका कमी करण्यासाठी श्रवणयंत्राच्या वापराची परिणामकारकता अस्पष्ट राहिली आहे. स्मृतिभ्रंश कमी करण्यासाठी श्रवणयंत्र हे कमीत कमी आक्रमक, किफायतशीर उपचार असू शकते, हा आजपर्यंतचा सर्वोत्कृष्ट पुरावा असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. त्यामुळे स्मृतिभ्रंशावरील श्रवणशक्ती कमी होण्याचा संभाव्य परिणाम कमी होऊ शकतो असेही चीनमधील शानडोंग विद्यापीठातील प्रोफेसर डोंगशान झू यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
स्मृतिभ्रंशाचा धोका 42 टक्क्यांनी होता जास्त : लँसेटने या याबाबतचे संशोधन प्रकाशित केले आहे. यात संशोधकांनी 4 लाख 37 हजार 704 नागरिकांचा डेटा तपासला. त्यांचे सरासरी वय 56 वर्षे होते. यातील सुमारे तीन चतुर्थांश नागरिकांना अर्थात 3 लाख 25 हजार 882 जणांना ऐकण्याची कमतरता नव्हती. उर्वरित एक चतुर्थांश म्हमजेच 1 लाख 11 हजार 822 नागरिकांना श्रवणाचा दोष होता. श्रवणशक्ती कमी झालेल्यांपैकी 11.7 टक्के म्हणजेच 13 हजार 092 नागरिक श्रवणयंत्रे वापरतात. सामान्य श्रवणशक्ती असलेल्या नागरिकांच्या तुलनेत श्रवणयंत्रे न वापरणार्या नागरिकांना स्मृतिभ्रंशाचा धोका 42 टक्क्यांनी जास्त होता. तर श्रवणयंत्रे वापरणाऱ्या श्रवणशक्ती कमी झालेल्या लोकांमध्ये कोणताही धोका वाढलेला नसल्याचे या संशोधकांनी स्पष्ट केले.
श्रवणयंत्रांचा वापर न करणाऱ्या नागरिकांना आहे धोका : या संशोधनात श्रवणयंत्रांचा वापर न करणाऱ्या नागरिकांमध्ये अंदाजे 1.7 टक्के स्मृतिभ्रंश होण्याच्या धोका आहे. श्रवणशक्ती कमी झालेल्या मात्र श्रवणयंत्रे वापरत आहेत, अशा नागरिकांमध्ये 1.2 टक्के धोका आहे. स्मृतिभ्रंश निदान होण्यापूर्वी हळूहळू संज्ञानात्मक घट 20 ते 25 वर्षे टिकू शकत असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. त्यामुळे अशा नागरिकांना श्रवणयंत्रांची तातडीची गरज पडू शकत असल्याचेही झू यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - World Art Day 2023 : काय आहे जागतिक कला दिनाचा इतिहास, कोण होते लिओनार्दो दा विंची, जाणून घ्या सविस्तर