सॅन फ्रान्सिस्को : OpenAI च्या चॅटजीपीटीशी स्पर्धा करण्यासाठी गुगल मे महिन्यात 20 आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणण्याची तयारी करत आहे, अशी माहिती मीडिया रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. टेक दिग्गज Google या वर्षी मे महिन्यात त्यांच्या वार्षिक विकासक परिषदेत किमान 20 आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) समर्थित साधने आणि सर्च चॅटबॉट सादर करण्याची तयारी करत आहे. OpenAI चॅटजीपीटी द्वारे समर्थित चॅटबॉटने गेल्या अनेक महिन्यांत टेक जगाला वेड लावले आहे. कारण ते लोकांना आवश्यक असलेली माहिती समजण्यायोग्य पद्धतीने सादर करू शकते, असे Engadget अहवाल सांगते.
सुंदर पिचाई यांनी 'कोड रेड' घोषित केले : Google चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी 'कोड रेड' घोषित केले आहे आणि AI विकासाला प्रोत्साहन दिले आहे. कारण टेक जायंट ChatGPT चा गूगलला सर्च इंजीन व्यवसायासाठी धोका आहे. स्लाइड डेकनुसार, टेक जायंटच्या AI प्रोजेक्ट्समध्ये इमेज जनरेशन टूल, AI टेस्ट किचनची सुधारित आवृत्ती, YouTube साठी TikTok-शैलीचा ग्रीन स्क्रीन मोड आणि एक टूल, जे इतर क्लिपचा सारांश देण्यासाठी व्हिडिओ तयार करू शकतात.
डेव्हलपरला अँड्रॉइड अॅप्लिकेशन्स तयार करण्यात मदत : गुगल एका नवीन प्रोजेक्टवर देखील काम करत आहे. गुगल शॉपिंग ट्राय-ऑन नावाच्या वैशिष्ट्यावर देखील काम करण्याची शक्यता आहे. जे पिक्सेल फोनसाठी वॉलपेपर मेकर आणि एआय-चालित साधन आहे. जे डेव्हलपरला अँड्रॉइड अॅप्लिकेशन्स तयार करण्यात मदत करू शकतात. स्लाइड डेकमध्ये एआय तंत्रज्ञानाचे प्राथमिक धोके म्हणून 'कॉपीराइट, प्रायव्हसी आणि अविश्वास' यांचा उल्लेख केला आहे. अहवालात म्हटले आहे की, 'गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी गेल्या महिन्यात गुगलचे संस्थापक लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांना भेटण्यासाठी, तसेच एआय योजनांचे पुनरावलोकन करण्यासाठी आणि इनपुट ऑफर करण्यासाठी आणले होते.'
आर्टिफिशियल इंटेलिजेंस चॅटबॉक्स : चॅट जीटीपी हे एक आर्टिफिशियल इंटेलिजेंस चॅटबॉक्स आहे. जे आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे काही सेकंदात देते. या चॅट जीपीटीवर आपल्याला गुगलसारखेच सगळ्या प्रशनांची उत्तरे मिळतात. त्यामुळे गुगलसारखेच ते एक सर्च इंजिन म्हणूनही काम करते. विशेष म्हणजे चॅटजीपीटी हे गुगलपेक्षाही दोन पावले पुढ असलेले सर्च इंजिन असल्याचेही बोलले जाते. त्यामुळेच ते सध्या ट्रेंड करत आहे.
कसे देते प्रश्नांची उत्तरे : आर्टिफिशियल इंटेलिजेंस चॅटबॉक्स बनवणाऱ्या कंपनीने चॅटजीटीपी हे फिचर बनवले आहे. त्यामुळे त्यामध्ये चांगलेच अॅडव्हांस फिचरचा समावेश आहे. मात्र हे काम कसे करते, हा सगळ्यात मोठा प्रश्न यूजरला भेडसावत आहे. त्याचे उत्तर अगदी सोपे आहे. चॅटजीपीटी उत्तर देण्यासाठी प्रश्नांना नैसर्गिक भाषेत प्रोसेसिंग ( NLP ) करते. त्याची बांधणीच अशी करण्यात आलेली आहे की, ते ह्युमन लाईक टेक्स जनरेट करु शकते. इतकेच नाही, तर चॅट जीपीटी भाषा ट्रान्सलेशन करुन त्याचे संक्षिप्त रुपातही भाषांतर करते. त्यामुळे आपल्याला प्रश्नांची उत्तरे सुटसुटीत मिळतात. म्हणून यूजर चॅट जीपीटीकडे आकर्षित होत आहेत.
कसा करावा चॅट जीपीटीचा उपयोग : चॅट जीपीटी खूपच सुविधाजनक बनवण्यात आलेलेल आहे. मात्र अद्यापही कंपनीने आपले अॅप बाजारात लाँच केले नाही. त्यामुळे सध्यातरी यूजरला वेबपेजला भेट देऊनच चॅटजीपीटीचा वापर करावा लागतो. त्यासाठी यूजरला chat.openai.com या वेबपेजला भेट द्यावी लागते. या पेजला भेट दिल्यानंतर यूजरला आपला मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी शेअर करुन लॉग इन करावे लागते. त्यानंतर चॅटजीपीटीचे होम पेज ओपन होते. चॅट जीपीटीचे होम पेज ओपन झाल्यानंतर इथे सर्चचे ऑप्शन दिसून येते. सर्च बारवर आपण आपला प्रश्न टाकून सर्च करू शकतो. त्यानंतर काही सेकंदात आपल्याला आपल्या प्रश्नांचे उत्तर मिळते.
काय नाही करु शकत चॅट जीपीटी : गुगलला टक्कर देणाऱ्या या चॅट जीपीटीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र चॅट जीपीटीचेही काही कमकुवत दुवे आहेत. चॅट जीपीटी हे 2021 च्या अगोदर बनवण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये 2021 च्या अगोदरची सगळी माहिती फिड केलेली आहे. त्याच्यानंतरची माहिती त्यामध्ये नाही. त्यामुळे ते 2021 च्या नंतरची माहिती नाही देऊ शकत. चॅट जीपीटी हे एक मशीन लर्निंग बेस्ड चॅटबॉक्स आहे. त्यामुळे त्यामध्ये जितकी माहिती फिड केली आहे, त्याचेच ते उत्तर देते.