ETV Bharat / science-and-technology

नोकियाचा नेकबँड, ब्लुटुथ इअरफोन फ्लिपकार्टवर उपलब्ध

नोकियाच्या नेकबँडची किंमत 1999 तर वायरलेस इअरफोनची किंमत 3999 इतकी असणार आहे. 9 एप्रिलपासून हे प्रॉडक्ट फ्लिपकार्टवर उपलब्ध असतील.

नोकियाचा नेकबँड, ब्लुटुथ इअरफोन फ्लिपकार्टवर उपलब्ध
नोकियाचा नेकबँड, ब्लुटुथ इअरफोन फ्लिपकार्टवर उपलब्ध
author img

By

Published : Apr 9, 2021, 8:26 AM IST

बंगळुरू : ई-कॉमर्स मार्केटप्लेस फ्लिपकार्टने नोकियाचे ब्लुटुथ नेकबँड आणि ट्रु वायरलेस इअरफोन लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. नोकियाच्या नेकबँडची किंमत 1999 तर वायरलेस इअरफोनची किंमत 3999 इतकी असणार आहे. 9 एप्रिलपासून हे प्रॉडक्ट फ्लिपकार्टवर उपलब्ध असतील.

युवकांसाठीचे तंत्रज्ञान

नोकिया ब्लुटुथ हेडसेट टी2000 आणि ट्रु वायरलेस इअरफोन एएनसी टी3110 हे प्रामुख्याने महाविद्यालयीन शहरी युवकांना डोळ्यांसमोर ठेवून बनविण्यात आले आहेत. हेडसेट क्लालकॉम क्युसीसी 3034 ब्लुटुथ ऑडिओ चिपसेटद्वारे संचलित आहे. यात क्वालकॉम सीवीसी इको कॅन्सलेशन आणि नॉईस रिमूव्हल तंत्रज्ञान आहे. बँकग्राऊंडला होणारा आवाज कमी करण्यासाठी हे डिझाईन करण्यात आले आहे.

वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञान

आमचे क्वालकॉम क्यूसीसी 3034 ब्लुटुथ ऑडिओ एसओसी ऑडिओ तंत्रज्ञान वैशिष्टपूर्ण असल्याचे क्वालकॉम इंडियाचे सीनिअर डायरेक्टर उदय डोडलांनी म्हटले आहे. प्रीमीयम वायरलेस साऊंड क्वालिटी, ऊर्जेचा वापर आणि वापरकर्त्यासाठी सुविधेविषयी कसलिही तडजोड न करता मजबूत कनेक्टिव्हीटीसाठी हे बनविण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नेकबँडमध्ये रॅपिड चार्जिंगचेही फीचर

युझर्स आपल्या हॉप मोडच्या माध्यमातून डबल टॅपच्या सहाय्याने सहजरित्या दोन्ही उपकरणांदरम्यान स्वीच करू शकतात. नोकिया ट्रु वायरलेस इअरफोन एएनसी टी3110 मध्ये अॅक्टिव्ह नॉइस कॅन्सलेशन आणि आयपीएक्स-7 तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. दोन्ही उपकरणांमध्ये ब्लुटुथ 5.1 तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

नोकियाने सादर केलेली दोन्ही उपकरणे ग्राहकांसाठी सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत असल्याचे फ्लिपकार्टचे ब्रँड उपाध्यक्ष चाणक्य गुप्तांनी म्हटले आहे. युझर्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही उपकरणे सक्षम ठरतील असे ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.