नवी दिल्ली - तुम्ही अनेकदा महत्त्वाच्या वस्तू हरवित असाल तर सॅमसंगने तुमच्यासाठी खास उत्पादन आणले आहे. कंपनी खास डिव्हाईस लाँच करणार आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या हरवेल्या वस्तू शोधणे शक्य होणार आहे.
गॅलक्सी स्मार्ट टॅग या सॅमसंग डिव्हाईसचे चालू महिन्यात लाँचिग होणार आहे. हे डिव्हाईस ब्ल्यूटूथला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे डिव्हाईस सापडत नसेल तर शोधून काढणे शक्य होणार आहे. स्मार्ट टॅगमध्ये बदलता येवू शकणारी सेल बॅटरी असल्याची माहिती सॅमसंगने शेअर बाजाराला दिली आहे.
हेही वाचा-चीनमध्ये तयार झालेल्या टेस्ला 'मॉडेल वाय'ची विक्री सुरू!
सॅमसंग ट्रॅकरचे फायदे-
- ब्ल्यूटुथ ट्रॅकर फोन, कीचेन अशा वस्तु शोधण्यासाठी वापरता येतो.
- हे चौरसाकृती ट्रॅकर कोणत्याही वस्तुला जोडता येते.
- तसेच त्याच्या ठिकाणाचीही माहिती कळू शकते.
- वस्तु हरविल्यानंतर त्याचे अलर्ट हे वापरकर्त्याला मिळू शकतात. सॅमसंग गॅलक्सी स्मार्ट टॅग ट्रॅकर हे चौरसाकृती आहे.
हे ट्रॅकर काळ्या आणि पांढऱ्या रंगात उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा-' राज्याच्या महसुलात चार महिन्यात ३६७ कोटी रुपयांची वाढ'
सॅमसंग नवा स्मार्टफोन लाँच करणार-
सॅमसंग पुढील वर्षी आपला नवीन स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. गॅलेक्सी सिरीजमधील ओ ७२ हा स्मार्टफोन ग्राहकांना विविध फिचर्ससह मिळणार आहे.8 जीबी रॅमसह ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720जी प्रोसेसर यात देण्यात येईल, असे कंपनीने म्हटले आहे. तर याचे एसएम-ए 725 एफ आणि एसएम-ए 726 बी मोड्स अनुक्रमे 4जी आणि 5जी आवृत्तीसह बाजारात आणले जातील, असे जीएसएम अरिनाने म्हटले आहे.