ETV Bharat / science-and-technology

Digital Content Change Your Perception : डिजिटल कंटेन्ट बदलू शकतो तुमचा दृष्टीकोन, कसा ते वाचा... - निकोलस दुग्गन

डिजिटल कन्टेन्ट तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो असा दावा न्यूयार्क येथील स्टेट विद्यापीठाच्या मानसशास्त्राचे प्राध्यापक पीटर गेरहार्डस्टीन आणि त्यांचा संशोधक विद्यार्थी निकोलस दुग्गनने केला आहे. मोबाईल आणि टीव्हीची स्क्रीन आधुनिक मानवी जीवनावर वर्चस्व गाजवत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Digital Content
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Feb 22, 2023, 6:45 PM IST

न्यूयार्क : आधुनिक आयुष्य मानवी जीवनावर बरेच परिणाम करते. सध्या मोबाईल किवा टीव्हीचा स्क्रीन आधुनिक मानवी जीवनावर वर्चस्व गाजवत आहेत. झूम मिटींग, वेबसाईट, स्मार्टफोन, व्हिडिओगेम, टेलिव्हिजन आदींसह सोशल माध्यमातही स्क्रीन महत्वाची भूमिका निभावते. मात्र या स्क्रीनकडे आपण कसे पाहतो, असा प्रश्न असतो. न्यूयार्क येथील स्टेट विद्यापीठाच्या मानसशास्त्राचे प्राध्यापक पीटर गेरहार्डस्टीन आणि त्यांचा संशोधक विद्यार्थी निकोलस दुग्गन यांनी नुकतेच एक संशोधन केले आहे. या संशोधनानुसार डिजिटल कंटेन्ट तुमचा दृष्टीकोन बदलू शकतो, असा दावा करण्यात आला आहे.

स्क्रीन गाजवते आधुनिक जीवनावर वर्चस्व : प्राध्यापक पीटर गेरहार्डस्टीन आणि त्यांचा संशोधक विद्यार्थी निकोलस दुग्गन यांने नुकत्याच जर्नल पर्सेप्शनमध्ये प्रकाशित झालेल्या लेव्हल्स ऑफ ओरिएंटेशन बायस डिफरन्स अॅक्रॉस डिजिटल कंटेंट कॅटेगरीज : इम्प्लिकेशन्स फॉर व्हिज्युअल परसेप्शन हे संशोधन प्रकाशीत केले. या संशोधनामध्ये त्यांनी डिजिटल कंटेन्ट तुमचा दृष्टीकोन कसा बदलू शकतो याबाबतची तथ्य मांडल्यााच दावा केला आहे.

संशोधनातून मांडला ऑब्लिक इफेक्ट : डिजिटल कंटेन्ट तुमच्या आयुष्यावर फार मोठा प्रिणाम करु शकतो, असे या संशोधनातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्राध्यापक पीटर गेरहार्डस्टीन आणि त्यांचा संशोधक विद्यार्थी निकोलस दुग्गन यांनी आपल्या संशोधनातून ऑब्लिक इफेक्ट मांडाला आहे. जेव्हा तुम्ही कोणत्याही साईटवर ऑनलाईन असता, तेव्हा तुम्ही वेगळ्याच जीवनात जगत असता. ही ऑनलाईन माहिती नैसर्गिक, शहरी आणि उपनगरीय वातावरणातील चित्रांपेक्षा वेगळी असते. त्याचे परिक्षण अभिमुखतेने करण्याचे काम या संशोधनातून करण्यात आले. याबाबत प्राध्यापक पीटर गेरहार्डस्टीन यांनी ऑब्लिक इफेक्टचा अभ्यास करण्याबाबतचे सूचवले आहे. प्राध्यापक पिटर म्हणाले ऑनलाईन असताना तुम्ही तिरकस परिणामाचा अभ्यास करता. यावेळी मेंदू तिरकस कोनातून येणाऱ्या रेषांपैकी उभ्या रेषांवर जास्त लक्ष्य केंद्रित करतो असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या पद्धतीने करा विचार : नैसर्गिक जगात आपल्याला अनेक घटना दिसतात. त्यातही झाडे, झाडाच्या फांद्या, उतार असलेल्या कडेला डोलणारी फुले आदी. मात्र मानवाने निर्माण केलेल्या कृत्रिम वातावरणात हे दिसणार नाही. तर यापैकी अनेक घटना काढून टाकलेल्या दिसून येईल, असा दावा प्राध्यापक पिटर यांनी केला आहे. त्याउलट लँडस्केपमध्ये आडव्या आणि उभ्या वस्तू इमारती, पथदिवे, पॉवरलाइन्स आणि रस्त्यांच्या चिन्हांचे वर्चस्व आहे. उपनगरीय वातावरण, निसर्गात भर घालत आहेत. डिजिटल मीडिया, झूम व्हिडिओ कॉल आणि वेबसाइट्सपासून व्हिडिओ गेमपर्यंत, वेगळा प्रभाव देखील प्रदर्शित करतात. या लेखात संशोधकांनी कार्टून आणि व्हिडीओ गेम्सपासून वेबसाइट्सपर्यंत डिजिटल दृश्यांच्या विस्तृत श्रेणीच्या व्हिज्युअल अभिमुखतेची तपासणी करण्यासाठी फूरियर विश्लेषणाचा वापर केला आहे. तर यातील परिणामांची तुलना नैसर्गिक, उपनगरी आणि शहरी वातावरणातील वास्तविक जीवनातील दृश्यांशी केली आहे. नागरिक त्यांचा सर्वाधिक वेळ डिजिटल प्लॅटफॉर्मवर व्यतीत करतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - Chip to Knock Out Unwanted Signals : अनवॉन्टेड सिग्नलपासून आता चीप करेल मोबाईलची सुटका, जाणून घ्या काय आहे प्रकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.