हैदराबाद : जहांगीर रतनजी दादाभाई टाटा हे केवळ भारतीय उद्योगातच नव्हे तर आधुनिक भारतीय इतिहासातील एक आदरणीय नाव आहे. जेआरडी टाटा हे टाटा समूहाचे दीर्घकाळ अध्यक्ष होते. ते त्यांच्या आदर्शांसाठी ओळखलं जातं आणि त्यांनी आपल्या अथक प्रयत्नांनी समूहाला नवीन उंचीवर नेलं. ते प्रसिद्ध उद्योगपती रतनजी दादाभाई टाटा यांचे पुत्र होते. भारतात अनेक उद्योग सुरू करण्यासाठी त्यांची ओळख आहे. ते भारतातील पहिले परवानाधारक पायलट होते. भारतरत्न प्राप्त करणारे ते भारतातील पहिले उद्योगपती होते. 29 नोव्हेंबर रोजी भारतीय विमानचालनाचा जनक (Father of Indian Aviation) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आर डी टाटा ( JRD Tata ) यांची पुण्यतिथी आहे.
जमशेदजी टाटा यांच्याशीही संबंध होते : जेआरडी टाटा यांचा जन्म २९ जुलै १९०४ रोजी पॅरिसमध्ये झाला. ते त्यांचे वडील रतनजी दादाभाई टाटा आणि आई सुझान ब्रिएरे यांचे दुसरे अपत्य होते. त्यांचे वडील रतनजी टाटा हे प्रसिद्ध उद्योगपती जमशेदजी टाटा यांचे चुलत भाऊ होते. त्यांचे बहुतेक बालपण फ्रान्समध्ये गेले. नंतर त्यांनी मुंबईत येऊन प्राथमिक शिक्षण केले. मुंबईच्या कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं.
- व्यावसायिक पायलट होण्याचं स्वप्न : जेआरडींना लहानपणापासून विमानांची खूप आवड होती. वयाच्या १५ व्या वर्षी जेव्हा ते पहिल्यांदा विमानात बसले, तेव्हा त्यानी ठरवलं होतं की आपण विमान चालवणारच. त्यांच्या समर्पणामुळंच त्यांना वयाच्या 24 व्या वर्षी व्यावसायिक पायलटचा परवाना मिळाला आणि असं करणारे ते पहिले व्यक्ती ठरले.
- टाटा एअरलाइन्स ते एअर इंडिया : आरजेडी ने 1932 मध्ये टाटा एअरलाइन्स ची स्थापना केली होती. जी नंतर एअर इंडिया म्हणून प्रसिद्ध झाली. आपल्या कार्यकाळात त्यांनी एअर इंडियाला मोठ्या उंचीवर नेण्याचं काम केलं, ज्यामुळं एअर इंडियाची सेवा खूप प्रसिद्ध झाली. पण विमानं उडवण्याचा त्यांचा छंदही कायम होता.
हेही वाचा :