न्यूयॉर्क- दक्षिण आशियामध्ये 1.5 डिग्री तापमानाच्या उष्ण हवेचा परिणाम येत्या काळामध्ये कमी होणार आहे. उष्ण हवेमुळे पीक उत्पादक असलेल्या पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या राज्यांचे नुकसान होणार नाही. हे संशोधनाचे निष्कर्ष 'जियोफिजिकल रिसर्च लेटर्स' या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आले आहेत. येत्या काळात 1.5 डिग्री तापमानाच्या उष्ण हवा या सामान्यवत होणार आहेत.
अमेरिकाची ओक नॅशनल लॅबोरिटरीजमधील संशोधक मोतासि अशफाक यांच्या माहितीनुसार कमी तापमानातही उष्ण हवेचे घातक परिणाम होऊ शकतात. दक्षिण आशियासाठी येणारा काळ कठीण आहे. असे असले त्यापासून संरक्षण करणे शक्य आहे.
हेही वाचा-जागतिक बाजारात कच्च्या तेलाची घसरण; पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होण्याची शक्यता
संशोधकाच्या माहितीनुसार 2017 मधील शोध हे खोटे ठरले आहेत. त्यावेळेस संशोधकांनी 21 व्या शतकामध्ये दक्षिण आशियात उष्ण हवा वाहणार असल्याचे म्हटले होते. हे संशोधन खूप मर्यादित होते. यापूर्वीही उष्ण हवेने प्रभाव दाखविला होता. वर्ष 2015 मध्ये भारत आणि पाकिस्तानात उष्ण हवेच्या लाटेने हाहाकार उडाला होता. या उष्ण हवेमुळे सुमारे 3,500 लोकांचा मृत्यू झाला होता. दमट हवामान असलेल्या ठिकाणी 32 डिग्रीचे तापमान हे कष्ट करण्यासाठी उपयुक्त मानले जात नाही. तर 35 डिग्रीपर्यंतचे तापमान हे मानवी शरीरासाठी जास्तीत जास्त मर्यादित मानले जाते. यापेक्षा जास्त वातावरणात सुरक्षेशिवाय कष्ट करणे घातक ठरू शकते. मागील वेळेसची तुलना करता 2.7 टक्के लोकांना हे तापमान घातक ठरू शकते. संशोधक अशफाक यांच्या माहितीनुसार उष्ण हवा ही दक्षिण आशियासाठी अधिक धोकादायक ठरू शकते. त्यापासून संरक्षण करणे शक्य आहे.
हेही वाचा-कोरोनाचा वाढता संसर्ग; सीरमकडून इतर देशांना लस मिळण्यास होणार उशीर