ETV Bharat / science-and-technology

Dead Satellite To Crash Into Earth : मृत उपग्रह बुधवारी कोसळणार पृथ्वीवर, मानवाला धोका नसल्याचे नासाने केले स्पष्ट

author img

By

Published : Apr 18, 2023, 5:10 PM IST

रेशी हा मृत उपग्रह बुधवारी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणार आहे. रेशी उपग्रहाने शास्त्रज्ञांना शक्तिशाली उर्जेचे स्फोट कसे होतात, याबाबतची माहिती दिली आहे.

Dead Satellite To Crash Into Earth
संग्रहित छायाचित्र

वॉशिंग्टन : नासाचा NASA उपग्रह रेउवेन रामाटी हाय एनर्जी सोलर स्पेक्ट्रोस्कोपिक इमेजर (RHESSI) हा मृत झाला आहे. प्रक्षेपणानंतर तब्बल 21 वर्षांनी तो पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करण्याची अपेक्षा आहे. मात्र त्यामुळे मानवाला कोणताही धोका नसल्याचे अमेरिकेच्या अंतराळ संस्थेने म्हटले आहे. 2002 मध्ये लाँच करण्यात आलेल्या रेशीने RHESSI त्याच्या पृथ्वीच्या कक्षेतून सौर फ्लेअर्स आणि कोरोनल मास उत्सर्जनाचे निरीक्षण केले. त्यामुळे शास्त्रज्ञांना शक्तिशाली उर्जेचे स्फोट कसे तयार होतात, याबाबतची माहिती समजण्यास मदत झाली. नासाने 16 वर्षांनंतर 2018 मध्ये अडचणींमुळे हा उपग्रह रद्द केला होता.

उपग्रहामुळे होणार नाही हानी : उपग्रहाचे निरीक्षण करणार्‍या यूएस डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार हा उपग्रह बुधवारी रात्री 9:30 वाजता पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल अशी माहिती दिली आहे. या उपग्रहाचे वजन 660 पौंड असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. बुधवारी उपग्रहामुळे पृथ्वीवरील कोणालाही हानी पोहोचण्याचा धोका कमी असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. या उपग्रहाने ऑर्बिटल सायन्सेस कॉर्पोरेशन पेगासस एक्स एल रॉकेटवर उच्च ऊर्जा इलेक्ट्रॉन्सची प्रतिमा तयार करण्याच्या मोहिमेसह प्रक्षेपित केले. या उपग्रहाने इमेजिंग स्पेक्ट्रोमीटरने साध्य केले. त्याने सूर्यापासून क्ष किरण आणि गॅमा किरण रेकॉर्ड केले आहेत. रेशीने RHESSI पूर्वी सौर ज्वालांच्या गॅमा किरण प्रतिमा घेतल्या गेल्या नसल्याचेही यावेळी नासाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

वातावरणात अब्जावधी मेगाटन सोडतात उर्जा : रेशी या उपग्रहाकडील RHESSI डेटाने सोलर फ्लेअर्स आणि त्यांच्याशी संबंधित कोरोनल मास इजेक्शनबद्दल महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. या घटना काही मिनिटांत सौर वातावरणात अब्जावधी मेगाटन ऊर्जा सोडतात. विद्युत प्रणालीच्या व्यत्ययासह पृथ्वीवर परिणाम होऊ शकतात. त्यांना समजून घेणे आव्हानात्मक ठरल्याचेही नासाने स्पष्ट केले आहे. आपल्या मिशनच्या कार्यकाळात रेशी या उपग्रहाने RHESSI ने 1 लाखापेक्षा पेक्षा जास्त एक्स रे घटनांची नोंद केली. त्यामुळे शास्त्रज्ञांना सौर ज्वालांमधील ऊर्जावान कणांचा अभ्यास करता आला. इमेजरने संशोधकांना कणांची वारंवारता, स्थान आणि हालचाल निर्धारित करण्यात मदत केली. त्यामुळे त्यांना कणांचा वेग कोठे होतो, हे समजण्यास मदत झाली.

उपग्रहाने केले दस्तऐवजीकरण : वर्षानुवर्षे रेशी या उपग्रहाने RHESSI लहान नॅनोफ्लेअर्सपासून ते हजारो पटीने मोठ्या आणि अधिक स्फोटक असलेल्या मोठ्या सुपरफ्लेअर्सपर्यंत प्रचंड श्रेणीचे दस्तऐवजीकरण केले. रेशी या उपग्रहाने ज्वालाशी संबंधित नसलेले शोध देखील लावले आहेत. सूर्याच्या आकाराचे मोजमाप सुधारणे, पृथ्वीवरील गामा किरण चमकणे आदींचा समावेश असल्याचेही नासाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा - Tick Infection Affects Brain Cell : टिक इन्फेक्शनचा मेंदूतील विविध पेशींवर होतो परिणाम, विषाणू मेंदूतील पेशींना करतो संक्रमीत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.