न्यूयॉर्क : कोरोना झाल्यामुळे नागरिकांना वास ओळखण्यात अडचण येत असल्याचे बोलले जात होते. काही जणांना तर चव ओळखण्यासही असमर्थ असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र आता कोरोना १९ मुळे प्रोसोपॅग्नोसिया या आजाराने नागरिकांना ग्रासल्याचे कॉर्टेक्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेला संशोधनात उघड झाले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रोसोपॅग्नोसिया या आजारालाच फेस ब्लाईंडनेस असे संबोधले जात आहे. त्यामुळे कोरोनाचे दुष्परिणाम संपता संपेनात असेच दिसत आहे.
कोरोनामुळे उद्भवू शकतात न्यूरोलॉजिकल समस्या : अमेरिकेच्या डार्टमाउथ कॉलेजमधील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी 28 वर्षीय ग्राहक सेवा प्रतिनिधी असलेल्या अॅनी महिलेवर संशोधन केले आहे. मार्च 2020 मध्ये अॅनीला कोविडचे निदान झाले होते. त्यानंतर पुन्हा तिला दोन महिन्यांनंतर कोरोनाची लक्षणे दिसू लागली. त्यानंतर लगेच तिला तिला चेहरा ओळखण्यात अडचण येत असल्याचे लक्षात आल्याचे या संशोधनात नमूद करण्यात आले आहे. अॅनिसोबत पहिल्यांदा भेट झाल्यानंतर तिने आपण कुटूंबियांचे चेहरे ओळखू शकत नसल्याचे सांगितल्याचे डार्टमाउथ कॉलेजमधील मनोवैज्ञानिक आणि संशोधक मेरी-लुइस किसेलर यांनी सांगितले. अॅनी आता तिच्या जवळच्या लोकांना ओळखण्यासाठी आवाजांचा आधार घेत अवलंबून आहे.
कोरोनामुळे नागरिकांना चेहरे ओळखण्यात अपयश : अॅनीला झालेला आजार हा गंभीर स्वरुपाचा असून त्यामधून प्रोसोपॅग्नोसिया हा आजार झाल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. अॅनीला प्रोसोपॅग्नोसिया हा आजार मेंदूला हानी झाल्यामुळे होण्याची शक्यता असल्याने आमचे लक्ष वेधून घेतल्याचे डार्टमाउथ कॉलेजमधील मानसशास्त्राचे प्राध्यापक तथा संशोधक ब्रॅड ड्यूचेन यांनी स्पष्ट केले. ही घटना मेंदूच्या टेम्पोरल लोबमधील क्षेत्रांवर अवलंबून असलेल्या दोन क्षमतांमुळे ही घटना झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
54 कोरोना रुग्णांवर केले संशोधन : अॅनीला झालेल्या फेस ब्लाईंड आजाराने इतर कोरोना रुग्णांनाही ग्रासले आहे का याची खात्री करण्यासाठी डार्टमाउथ कॉलेजमधील संशोधकांनी पडताळणी केली. यासाठी त्यांनी 54 कोरोना रुग्णांचा डेटा प्राप्त केला. या कोरोना रुग्णांना 12 आठवडे किंवा त्याहून अधिक काळ कोविडच्या आजाराने ग्रासले होते. त्यानंतर त्यांनी 32 रुग्णांना कोविड-19 मधून पूर्णपणे बरे झाल्याची नोंद केली होती. दीर्घ कोविड असलेल्या बहुतेक रुग्णांनी कोविडमुळे त्यांची आकलन क्षमता कमी झाल्याचे नोंदवले आहे. ते आश्चर्यकारक नसल्याचे या संशोधनाच्या संशोधक कीसेलर यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा - Bacterial Enzyme : शास्त्रज्ञांना सापडले हवेचे विजेमध्ये रूपांतर करणारे एंजाइम