ETV Bharat / science-and-technology

ChatGPT Allegation On Law Professor : चॅट जीपीटीच्या खोटेपणाचा भांडाफोड, प्राध्यापकाने लैंगिक छळाची रचली खोटी कथा - जोनाथन टर्ली

चॅट जीपीटीने आपल्या संशोधनात विद्यार्थ्यांच्या लैंगिक छळाची खोटी कथा रचून त्यात निर्दोष प्राध्यापकाचे नाव गोवल्याने खळबळ उडाली आहे. हे कायद्याचे प्राध्यापक कधीही अलास्काला गेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ChatGPT
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 6, 2023, 4:32 PM IST

सॅन फ्रान्सिस्को : चॅट जीपीटीने संशोधनाच्या यादीत एका सुप्रसिद्ध प्राध्यापकाचे नाव विद्यार्थ्यांच्या लैंगिक छळ प्रकरणात दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. जोनाथन टर्ली असे त्या चॅट जीपीटीने विद्यार्थ्यांच्या लैंगिक छळ प्रकरणात नाव घेतलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. जोनाथन टर्ली हे जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातील कायद्याचे प्राध्यापक आहेत. चॅट जीपीटीने विद्यार्थ्यांच्या लैंगिक छळ प्रकरणात नाव घेतल्याने प्राध्यापक जोनाथन टर्ली यांना धक्काच बसला आहे.

चॅट जीपीटीने लैंगिक अत्याचाराची रचली खोटी कथा : प्राध्यापक जोनाथन टर्ली यांना त्यांच्या सहकाऱ्याकडून एक इमेल मिळाला. त्या मेलवरुन त्यांना चॅट जीपीटीवर प्राध्यापकांनी केलेल्या विद्यार्थ्यांच्या लैंगिक छळाबाबतचे संशोधन सुरू असल्याची माहिती मिळाली. याच संशोधनात आपल्याविषयी विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ केल्याची खोटी कथा असल्याचेही दिसून आले. त्यामुळे चॅट जीपीटीने अलीकडेच माझ्यावर विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करणारी खोटी कथा जारी केल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

काय आहे चॅट जीपीटीने रचलेली कथा : अलास्काच्या सहलीवर कायद्याच्या विद्यार्थ्यांची छेड काढल्याचे चॅट जीपीटीच्या या संशोधनात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे 2018 च्या वॉशिंग्टन पोस्टच्या लेखात माझ्यावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आल्याची माहिती कळवल्याचे जोनाथन टर्ली यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे. मात्र मी कधीही विद्यार्थ्यांसोबत अलास्काला गेलो नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. द पोस्टने असा लेख कधीही प्रकाशित केला नसल्याचेही टर्लीने सांगितले. माझ्यावर कधीही लैंगिक छळ किंवा हल्ल्याचा आरोप आतापर्यंत कोणीही केला नाही. सर्वात धक्कादायक म्हणजे हा खोटा आरोप केवळ एआयने पब्लिश केला नसून द पोस्टच्या लेखावर आधारित आहे. मात्र पोस्टने कधीही अशाप्रकारचा लेख प्रसिद्ध केला नसल्याचेही प्राध्यापक जोनाथन टर्ली यांनी यावेळी सांगितले.

चॅट जीपीटीने महापौराविषयी दिली चुकीची माहिती : चॅट जीपीटीने ऑस्ट्रेलियातील हेपबर्न शायरचे महापौर ब्रायन हूड यांच्याबाबतही चुकीची माहिती दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या रिझर्व्ह बँक (RBA) मधील लाचखोरी घोटाळ्यात गुंतल्याप्रकरणी हूडला गुन्हेगार म्हणून चॅटजीपीटीने नाव दिले आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्टच्या मालकीच्या कंपनीने त्याच्याबद्दल चुकीची माहिती दुरुस्त न केल्यास ओपन एआयवर OpenAI दावा ठोकण्याचा इशारा महापौर ब्रायन हूड यांनी दिल्याचे वृत्त आयएनएसने दिले आहे.

हेही वाचा - Not Considering Law To Regulate AI : आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोखण्यासाठी कोणत्याही कायद्याचा विचार नाही, आयटी मंत्रालयाचा खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.