ETV Bharat / science-and-technology

Boeing End Production of Top Gun : बोईंग आपल्या 'टॉप गन' सुपर हॉर्नेट विमानाचे उत्पादन करणार बंद - बोईंग कंपनीत विलिनिकरण

बोईंग आपल्या टॉप गन असलेल्या सुपर हार्नेट विमानाचे उत्पादन थांबवणार आहे. या विमानाची ऑर्डर देऊन भारत या विमानाला २०२७ पर्यंत तारू शकतो, अशी माहिती बोईंग कपंनीच्या एअर डोमिनन्स विभागाचे उपाध्यक्ष स्टीव्ह नॉर्डलंड यांनी दिली

Boeing End Production of Top Gun
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Feb 24, 2023, 4:40 PM IST

आर्लिंग्टन ( यूएस ) : बोईंग कंपनी आपल्या टॉप गन असलेल्या सुपर हॉर्नेट या विमानाचे उत्पादन थांबवणार आहे. अमेरिकन नेव्हीला २०२५ मध्ये करण्यात येणाऱ्या अंतिम वितरणानंतर बोईंग आपल्या टॉप गन विमानाचे उत्पादन थांबवणार असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र भारताने ऑर्डर दिल्यास २०२७ या विमानाचे उत्पादन वाढवले जाऊ शकते, असेही या कंपनीच्या अधिकाऱ्याने नमूद केले आहे.

मॅकडोनेल डग्लस यांनी केली होती टॉप गन विमानाची निर्मिती : पहिल्या विमानाची निर्मिती १९८३ मध्ये मॅकडोनेल डग्लस यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी १९९७ मध्ये ही कंपनी बोईंग कंपनीत विलिनिकरण करण्यात आली होती. या विमानाचे आतापर्यंत २००० पेक्षाही जास्त विमाने, सुपर हॉर्नेट, आणि ग्रोलर्स अमेरिकन लष्कराला वितरित करण्यात आली आहेत. त्यानंतर कॅनडा, फिनलंड, ऑस्ट्रेलिया आणि मलेशियासह अनेक राष्ट्रांना सुपर हॉर्नेट विमानाचे वितरण करण्यात आले आहे.

सुपर हॉर्नेट्स खरेदी न करण्याची योजना : मात्र अलीकडच्या काळात विमानाचे भवितव्य संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. नौदलाने विमानाच्या डिझाईनच्या वयाचा हवाला देऊन 2021 च्यानंतर कोणतेही सुपर हॉर्नेट्स खरेदी न करण्याची योजना आखली. केवळ काँग्रेसमुळे या विमानाचे उत्पादन सुरू ठेवण्यात आले आहे. बोईंगने प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी वापरलेले शेवटचे 747 जंबो जेट वापरले आहे. मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी वापरलेल्या या विमानाला त्याला ५० वर्ष झाले आहेत.

बोईंग लढाऊ विमाने करणार तयार : सुपर हॉर्नेट F/A-18 चे उत्पादन बंद केल्यानंतर बोईंग लष्करी विमान बनवण्यावर आपले लक्ष केंद्रित करणार आहे. बोईंग त्यानंतर क्रूड आणि अनक्रूड अशा दोन्ही प्रकारची विमाने बनवणार आहे. त्यासह इतर संरक्षण कार्यक्रमांचे उत्पादन बोईंग करणार असल्याचेही कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. सेंट पीटर्सबर्ग येथे तीन नवीन सुविधा निर्माण करण्याची बोईंगची योजना असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. लुईस येथे सुपर हॉर्नेट F/A-18 विमाने एकत्र केले जातात. बोईंग भविष्यातील अनेक योजना आखत असल्याची माहिती बोईंगच्या एअर डोमिनन्स विभागाचे उपाध्यक्ष स्टीव्ह नॉर्डलंड यांनी दिली. बोईंग लढाऊ विमाने तयार करणार असून लढाऊ विमान बनवने आमच्या डीएनएमध्ये असल्याचेही स्टीव्ह नॉर्डलंड यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - Youngest Person Diagnosed Alzheimer : 19 वर्षीय तरुणाला झाला स्मृतीभ्रंश, नोंदवला जाणार 'हा' विक्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.