सॅन फ्रान्सिस्को : टेक दिग्गज अॅपल एका नवीन इन-हाउस चिपवर काम (Apple working on all in one chip) करत आहे. ते त्यांच्या डिव्हाइसेसवर सेल्युलर, वाय-फाय आणि ब्लूटूथच्या कार्यक्षमतेला सक्षम करण्याची शक्यता आहे. द व्हर्जने दिलेल्या ब्लूमबर्गचा अहवालनुसार, आयफोन निर्माता सध्या ब्रॉडकॉम वरून वापरत असलेल्या वाय-फाय आणि ब्लूटूथ चिप्सच्या (Bluetooth chip) रिप्लेसमेंटवर देखील काम करत आहे. 2025 मध्ये त्यांना डिव्हाइसेसमध्ये एकत्रित करण्याची योजना आखत आहे.
स्वतःचे सेल्युलर मोडेम विकसित करण्याचा प्रयत्न : याव्यतिरिक्त, टेक जायंट क्वालकॉम (Tech Giant Qualcomm) मॉडेम बदलण्यासाठी स्वतःचे सेल्युलर मोडेम विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. कंपनीने 2024 च्या सुरूवातीला किंवा 2025 च्या सुरुवातीला स्वतःचे मोडेम वापरणे अपेक्षित आहे. क्वालकॉमचे प्रवक्ता क्लेयर कॉनली एका निवेदनात म्हणाले, अॅपलच्या उत्पादनासाठी, आम्ही आता 2023 आयफोन लॉन्चसाठी 5G मॉडेमची (modem development) अपेक्षा करत आहोत. ते आमच्या पूर्वीच्या अपेक्षेपेक्षा 20 टक्के जास्त आहे.
चिप आणि मॉडेमच्या विकासावर काम करणार : क्वालकॉमच्या प्रवक्त्याने सांगितले की, याशिवाय आमच्या नियोजनात कोणताही बदल झालेला नाही. या अहवालात असे म्हटले आहे की, आयफोनमध्ये एकत्रित सेल्युलर, वाय-फाय आणि ब्लूटूथ चिप कधी इंटीग्रेट केली जाईल हे अद्याप स्पष्ट नाही. अॅपल आपले उत्पादन सुधारण्यासाठी सतत काम करत आहे. यावेळेस ते इन-हाउस चिप आणि मॉडेमच्या विकासावर काम करत आहे.
डिझाइन केलेले चिप आणि मॉडेम : कंपनीला विश्वास आहे की, इन-हाउस डिझाइन केलेले चिप आणि मॉडेम तंत्रज्ञानामध्ये दररोज येणाऱ्या बदलांसह ग्राहकांच्या मागणीची पूर्तता केली जाईल. याशिवाय चिप आणि मॉडेमची पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यावर उत्पादनाच्या मार्केटिंगमध्ये अनेक वेळा समस्यांना सामोरे जावे लागते.
दुसरे वर्जन लॉन्च करण्याची शक्यता : अॅप्पलने त्याच्या एअरपॉड्स प्रो (AirPods Pro) ची दुसरी सिरीज रिलीज केली. त्यांनी एच1 (H1) प्रोसेसरसह अनेक अपग्रेड ऑफर केले. आपल्या उत्पादनाची मागणी कायम ठेवण्यासाठी, कंपनी परवडणाऱ्या किमतीच्या विभागात त्याचे दुसरे वर्जन लॉन्च करू शकते. त्याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स उघड झाले नसले तरी कंपनीचा हेतू स्पष्ट आहे. विश्लेषकांचा दावा आहे की, स्वस्त एअरपॉड्स लाइटसह, ऍपल 'नॉन-ऍपल इयरबड्स'च्या बाजारपेठेत कमाई करण्याचा प्रयत्न करेल. 2022 मध्ये 7.3 कोटी युनिट्सऐवजी 2022 मध्ये फक्त 6.3 कोटी युनिट्स विकल्या जातील, असा अंदाज वर्तवला जात आहे.